कवी सर्जेराव चव्हाण यांना ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार जाहीर 

कवी सर्जेराव चव्हाण यांना ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार जाहीर 

बुलडाणा 
        मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्याच्या शिवेला-शिव असलेल्या मराठवाड्याच्या सिमेवरील वझर सरकटे या लहानश्या खेड्यात  आठराविश्व  गरीबी असलेल्या आई सुंदराबाईच्या पोटी जन्मलेल्या व लहानपणीच वडीलांचे क्षत्र हरवलेल्या उमद येथील उबाळे मामांच्या सहवासात संघर्षातून शिक्षण घेवून स्मृतीशेष बुलडाणा जिल्ह्याचे सिंदखेड राजा येथील आंबेडकरी चळवळीचे मावसा नागोराव जाधव गुरूजी यांच्या मार्गदर्शनाने पूढे बुलडाणा येथे एसटी महामंडळात कारकूनाची नोकरी करून घरसंसार संभाळून साहित्यातले राज्यस्तावरील उच्च पूरस्कार प्राप्त करणारे बुलडाणा येथील जेष्ठ कवी लेखक सर्जेराव चव्हाण यांना यंदाचा ‘ संजीवनी ‘ संस्थेचा सन्मानाचा ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार वितरण ६ जून २०२४ रोजी केळवद गावी होणार आहे. साहित्य क्षेत्रात गाजलेले ‘ आपण गाफील राहीलो तर..’ या काव्यसंग्रहाचे लेखक फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीचे लेखक कवी सर्जेराव चव्हाण हे जून्या पीढीतील अभ्यासू लेखक असून त्यांना यापूर्वीच मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार कामगार मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार , पूर्णा येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार , सोलापूरचा काव्यसाधना पुरस्कार , अंकुरचा अक्षरतपस्वी पुरस्कार , क्रांती ज्योती , पूणे येथील सत्यशोधक केळवद येथील शाहीर अमर शेख साहित्य आदी पुरस्कार मिळाले असून सत्यशोधक चळवळ फुले, शाहू, आंबेडकर चळवळ लेखन शिबिरे कवी संमेलने साहित्य समेलने यात सहभागी असून अखील भारतीय साहित्य समेलनातही निमंत्रीत कवी म्हणून हजेरी लावली आहे. आज सर्जेराव वयाच्या ७५ व्या वर्षीही जोमाने दमाने काव्य सादर करतात. त्यांच्या हातात 
रांत्रदिवस पुस्तके असतात वाचतात लिहीतात झोपतांनाच पुस्तके व पेपर ठेवनारे एकमेव साहित्तीक कवी म्हणून त्यांची ओळख आहे. नविन साहित्य पिढी युवक नवलेखक यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे सर्जेराव चव्हाण हे मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचे भूषण आहेत ‘ त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्या बरोबर त्यांचा आंबेडकरी विचारधारेचे व चळवळीचे पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी त्यांचा शब्द सुमनानी सत्कार केला. त्यांच्यावर साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *