बुलढाण्यात वामनदादा कर्डकांना कार्यक्रमातून अभिवादन….!
बुलढाणा(प्रतिनिधी)
पंढरीचा पांडुरंग मराठी माणसाच्या घराघरात पोहचविण्याचे काम ज्याप्रमाणे विद्रोही संत तुकाराम महाराजांनी केले अगदी त्याच पद्धतीने साडे तीनशे वर्षांनंतरच्या काळात महाकवी वामनदादा कर्डकांनी गाव- खेड्यात, वस्ती-वस्ती आणि माणसा- माणसापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे कार्य आणि विचार पोहचविण्याचे सामाजिक कार्य महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीत काव्य लेखन आणि गायनाद्वारे केले आहे असे विचार युवा शिक्षक तथा अभ्यासक संजय खांडवे यांनी मांडले.बुलढाणा येथील वामनदादा कर्डक पुतळा,हुतात्मा स्मारक परिसरात 15 मे 2024 रोजी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानद्वारा आयोजित महाकवी वामनदादा कर्डक 20 व्या स्मुर्तीदिनी अभिवादन सभेत बोलतांना मांडले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी आर इंगळे,सचिव साहित्यिक सुरेश साबळे,शाहीना पठाण,प्रज्ञाताई लांजेवार,शिवाजी गवई,भाऊ भोजने,पी आर इंगळे,अशोक दाभाडे,अजय बिलारी,पत्रकार दिपक मोरे,दै सकाळचे अरुण जैन, ग्रंथपाल कॉ.पंजाबराव गायकवाड कवी,नाटककार शशिकांत इंगळे,रविकिरण टाकळकर,रेखाताई बाबुराव गवई, शशिकांत जाधव, कवी सर्जेराव चव्हाण,अनंता मिसाळ,डी पी वानखेडे,रमेश आराख,अनिता कापरे मल्हारी गवई,मोहन सरकटे,बबन गवई,केशरताई इंगळे,युवराज कापरे,चंद्रकांत आराख,बी के इंगळे,मंगल मिसाळ,धम्मपाल गवई, शाहीर सुखदेव जाधव,अमोल खरे,संदीप मोरे इत्यादीसह विविध क्षेत्रातील महिला पुरुष आणि युवक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित मान्यवरासह सर्वांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर अनुक्रमे अशोक दाभाडे,शशिकांत इंगळे,शाहीना पठाण,पी आर इंगळे, प्रज्ञा लांजेवार, शशिकांत जाधव, शिवाजी गवई यांनी मनोगत मांडलीत. याप्रसंगी भीम ध्येयवादी कलापथक मंडळ वरवट (बकाल) ता संग्रामपूर यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला.यात शाहीर नागोराव इगळे,सुनीता वानखेडे,विनायक दांडगे,मुरलीधर अवचार,गोटीराम बोदडे यांसह कलावंतानी सहभाग नोंदवला.
वामनदादा कर्डक प्रतिष्ठान बुलढाणाद्वारा आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक,संचालन शाहीर डी आर इंगळे तर आभार आणि नियोजन साहित्यिक तथा प्रतिष्ठान सचिव सुरेश साबळे यांनी केले.