सहकार विद्या मंदिरच्या 18 शाळांचा  इय्यत्या 10 वीचा  100% निकाल

सहकार विद्या मंदिरच्या 18 शाळांचा  इय्यत्या 10 वीचा  100% निकाल

बुलडाणा 
    बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी अंतर्गत सहकार विद्या मंदिर, बुलढाणा व नांदेड जिल्ह्रात 18 शाळांनी 10 वी निकालात उत्तुंग भरारी घेत बाजी मारली. सहकार विद्या मंदिरच्या या भव्य यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      बुलडाणा शहरातील सहकार विद्या मंदिरच्या शाळेने आपली 100% यशाची परंपरा कायम राखली आहे. सुमारे 39 विद्याथ्र्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करीत विक्रम केला आहे. यामध्ये चि.अभिनव शिरसाठ याने 97.60% गुण मिळवित प्रथम क्रमांक तर कु. अनुष्का साखरे ने 97.00% मिळवित द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच सहकार विद्या मंदिर, सुलतानपूर येथील चि. प्रणव बोडखे यास 95.00% तर चि.अनुज भानापुरे यास 94.40% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच सहकार विद्या मंदिर, सुलतानपूर येथील चि. प्रणव बोडखे यास 95.00% तर चि.अनुज भानापुरे यास 94.40% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, धामणगांव बढे येथील कु. सानिका वाघमारे व कु. सलोनी जैयस्वाल यांनी 96.20% व कु. तेजस्विनी वैराळकर हिस 95.80% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, साखरखेर्डा येथील कु. गौरी काटे हिस 97.60% तर कु. नम्रता दळवी हिस 97.40% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.
 
      सहकार विद्या मंदिर, सिंदखेड राजा येथील कु. आरती ठाकरे हिस 94.80% तर कु. श्रद्धा वाघ यांनी 94.80% व चि. यश खरात यास 94.20% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, बिबी येथील चि. श्रीहरी दराडे व कु. ऋतुजा काकडे यांना 96.00% तर चि.ऋषिकेश कणखर, चि.प्रफुल हिवाळे व चि.अजिंक्य आटोळे यांनी 95.80% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, मोताळा येथील कु. भक्ती पाटील हिस 97.40% तर कु. श्रृती धोरण हिस 97.20% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, धाड येथील कु. तृप्ती धंदर व कु. गायत्री साखरे यांना 95.20% तर चि.महेंद्र सिरसाट यास 95.00% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, वरवट बकाल येथील कु.रुचा चौकट हिस 98.00% तर कु.धनश्री दाभाडे व कु. मयुरी भोंडे यांनी 96.00% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.
 
       सहकार विद्या मंदिर, देऊळगांव राजा येथील कु. आदिती सुरडकर हिस 95.00% तर चि.गोपाल गव्हाणे यास 94.40% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, डोंगरखंडाळा येथील कु. वैष्णवी राजपूत हिस 93.40% तर कु. गायत्री बरडे हिस 92.80% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, उदयनगर येथील चि. सोहम झाडे यास 94.20% तर चि.सोमेश हिवरकर 93.00% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, जळगांव जामोद येथील चि. राम राठी यास 96.00% तर कु. स्नेहल घाटे हिस 95.60% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.
    सहकार विद्या मंदिर, पिंपळगांव राजा येथील कु. अपेक्षा बोंबटकर हिस 96.20% तर कु. वैष्णवी वानखेडे हिस 95.60% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, देऊळगांव मही येथील चि. राहुल नागरे यास 97.20% तर कु. आर्या शिंगणे हिस 94.80% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.
      सहकार विद्या मंदिर, डोणगांव येथील चि. सुजल सुर्वे यास 96.20% तर चि. आदित्य पिंपरकर यास 95.00% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, जानेफळ येथील चि. साहिल पाडोळे यास 91.40% तर कु. चैताली काळे हिस 91.00% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सहकार विद्या मंदिर, धर्माबाद येथील चि. शिवम मोरडे यास 97.60% तर चि. युवराज झंवर यास 96.60% गुण प्राप्त करुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.
 
       विद्यार्थ्यांनी  प्राप्त केलेल्या या अभुतपूर्व यशाबद्दल बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष श्री.राधेश्यामजी चांडक, संस्थेच्या अध्यक्षा सौ.कोमल सुकेश झंवर, संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर यांनी सर्व विद्याथ्र्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय अध्यक्षा सौ.कोमल झंवर, प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांना दिले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *