दांडगे विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम
मासरुळ : धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड क्रॉप सायन्सच्या २०२३-२४ बॅचच्या विद्यार्थ्यांनी घबघवीत यश संपादन करुन विद्यालयाच्या निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली.
विद्याल्याचे १५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये विज्ञान शाखेतील प्राची हुडेकर ९३ टक्के गुण घेऊन प्रथम आलो. गोरी गवते हीने ९०.१७ टक्के, अनुराग बार्डे ९० टक्के, धीरज सोनुने ९० टक्के, आदित्य पाटील ९० टक्के गुण घेऊन घेऊन द्वितीय तर गौरी चेके ८९.३३ टक्के, समृद्धी वानखडे ८९ टक्के, प्रतोक्षा तायडे हीने ८९ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. तर दोन विद्यार्थ्यांनी ८८ टक्के, ९२ विद्यार्थ्यांनी ८७ टक्के, ४ विद्यार्थ्यांनी ८६ टक्के, २ विद्यार्थ्यांनी ८५ टक्के, ५ विद्यार्थ्यांनी ८४ टक्के, चार विद्यार्थ्यांनी ८३ टक्के, ७ विद्यार्थ्यांनी ८२ टक्के, ७ विद्यार्थ्यांनी ८१ टक्के, ८ विद्यार्थ्यांनी ८० टक्के, ५३ विद्यार्थ्यांनी ७५ तर ३७ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांवर गुण संपादन केले आहे. महाविद्यालयातील सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांचर पराकाष्ठा व विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या परिश्रमाचे हे चीज आहे. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा संस्थाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल.