भाई सोमचंद्र दाभाडे बुलडाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या ढाण्या वाघ….!
भाई सोमचंद्र दाभाडे बुलडाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या ढाण्या वाघ….!बुलडाणाभाई सोमचंद्र दाभाडे यांचं समस्त जीवन बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराशी कार्याशी त्यांनी पुकारलेल्या मानवतावादी लढ्याची समर्पित आहे. “अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो” गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो पेटून उठेल” विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी मानव मुक्तीचे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये अनेक कार्यकर्ते स्वतःच्या घरादाराचा कुटुंबाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मानव मुक्तीचा लढा पुकारला होता, त्या लढ्यामध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलं. अशा त्यागी कार्यकर्त्यामुळे मनुवादी वर्ण वर्चस्ववादी सनातनी प्रस्थापित समाज व्यवस्थेला हादरे देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झालं. महाराष्ट्रामध्ये पॅंथर चळवळीचा इतिहास अशाच प्रकारचा आहे. भारतीय दलित पॅंथर तरुण कार्यकर्त्यांनी आंबेडकरी समाजाला आत्मभान दिलं, अस्मिता दिली. मोडेल पण वाकणार नाही असा पॅंथर तरुणाईचा बाणा होता. त्यापैकीच एक बुलडाणा जिल्ह्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी विचाराने पेटून उठलेल एक स्वाभिमानी कमालीचं निडर निर्भय अशा प्रकारचं चरित्र संपन्न व्यक्तिमत्व भाई सोमचंद्र दाभाडे यांचा समस्त जीवन आणि कार्य आंबेडकरी चळवळीमध्ये परिवर्तन चळवळीमध्ये काम करणाऱ्या समोर दीपस्तंभ प्रमाणे आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात लढण्यामध्ये गेलं. त्यांनी स्वतःच्या घरादाराचा कुटुंबाचा विचार न करता ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असतील त्या-त्या ठिकाणी ते जात अन्याय मनोवादी वर्ण वर्चस्ववादी प्रवृत्तीला ते ठेचून काढत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये दबदबा होता अख्खं आयुष्य अन्याय, अत्याचार होत असलेल्या समाजासाठी समर्पित केलं. तारूण्यात आपल्या भविष्याचा विचार कधी केलाच नाही. नामांतरचा लढा असेल, गायरान जमीन अतिक्रमणे प्रकरणाचे आंदोलने, अन्याय अत्याचार कुटूंबाचे न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने, बहीष्काराराच्या घटना, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी न भरू देण्यासाठीचे आंदोलने, महीलांवरिल अत्याचारांच्या घटना, विद्यार्थी शिष्यवृत्तीचे आंदोलने, जिथे अन्याय झाला असेल तीथे भाई सोमचंद्र नसेल असे एकही प्रकरण नाही जिथे अन्याय तीथे भाई असं गणित असे, ना जेवनाची, झोपण्याची पर्वा ना आपल्या आई वडिलांसह कुटूंबाची पर्वा, या सर्व अनियमितेचा परिणाम आरोग्यावर होणारच. निसर्गाने व नियतीने भाईच्या शरीरावर घात केला व ते कीडणीच्या आजाराने पंधरा, विस वर्षा पासून त्या कीडणी आजारासी झूंज देत आहे, इतक्या मोठया भयंकर आजारावर मात करीत आजाराची परवा न करता ते समाजावरील अन्याय अत्याचारा विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी हजर असत जिथे समाजावर अन्याय अत्याचार झाला असेल भाई तीथे धाऊन जात. कलेक्टर, पोलीस अधिक्षक यांची भेट घेवून त्या प्रकरणाला न्याय मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसत नव्हते, असा हा आंबेडकरी पॅंथर आज रोजी एका ठीकाणी भयंकर आजारासी झुंज देत आहे.आंबेडकरी समाजात चळवळीचा कार्यकर्ता तयार होण्यासाठी विस ,पंचविस तीस वर्ष लागतात. कार्यकर्त्याच काम काही सोपे नसते. त्यासाठी खूप भांडवल खर्च झालेल असते. कार्यकर्ते समाजासाठी झटत असतात, झगडत असतात, सूखासुखी कार्यकर्त्यांच्या पदरात काहीही पडत नसत त्यासाठी त्याग ही आवश्यक असतो आणि कार्यकर्त्याच्या त्यागाच्या तेजावर चळवळ ऊभी रहात असते.त्याच अनूशंघाने भाई सोमचंद्र दाभाडे हे बुलडाणा जिह्यातील आंबेडकरी चळवळीतल एक मोठ नाव. त्यांनी त्याग आणि निष्ठेच्या बळावर जिल्ह्यात चळवळ ऊभी केली. विद्यार्थी दशेपासूनच मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात पेटून ऊठलेला हा बिन्नीचा शिलेदार आपल्या कत्वृत्वाने, वक्तृत्वाने, नेतृत्वाने बुलडाणा जिल्ह्यातील आंबेडकरी सामाजाच्या गळ्यातला ताईत झाला. चळवळीचा लोकप्रिय नेता झाला. कूशल संघटक, मानस जोडण्याची कला हे गूण अंगीच असल्यामूळे हजारो तरुण कार्यकर्त्यांची फौज सोमचंद्र भाईंनी ऊभी केली.भाई सोमचंद्र दाभाडे म्हणजे गजबजलेल्या वस्तीच गाव.भाई वाळवंटात जरी गेले तरी तिथे जञा भरविण्याचे सामर्थ्य त्यांच्या नेतृत्वात होत.भाईंचा स्वभाव मेनाहून ही मऊ,पण अन्याय अत्याचार दिसला की वज्राहून ही कठोर .खूप हळव्या मनाचा हा चळवळीचा नेता आपल्या सहकाऱ्याची आठवण काढतांना अगदी मायेन म्हणतो, भाई अशांत वानखेडे, भाई प्रदिप अंभोरे, भाई कैलास सुखधाने, भाई दिलीप खरात, दिलीपभाऊ जाधव, बाबासाहेब जाधव, चंद्रशेखर धंदरे, भाई मुरलीधर गवई, इंजि.विजय मोरे, भाऊसाहेब सरदार, भाई संजय वाकोडे, भाई बबन म्हस्के, दिलीप दौलत जाधव, दादाराव गायकवाड, भाई निळकंठ वानखेडे, संतोषभाऊ मेढे, सुपडा गरूडे ,गूलाबराव सरदार, आदि अनेक मिञांनी मला चळवळीत मनापासुन साथ दिली. या सर्व मिञांचे ऊपकार मी शिलालेखा सारखे काळजावर कोरून ठेवले आहेत, असे भावणीक उदगार त्यांनी काढले.जिव लावणारे शब्द आयुष्य घडवितात, जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवितात. शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात. शब्द यश देतात, शब्द नात देतात. शब्द आयुष्यभर मनामनात जपणारी भावना देतात. शब्दाच मोल जानल की आपल आयुष्य अनमोल होत. हे चळवळीच अनमोल नात सोमचंद्र भाई निकराने निभावतांना दिसत आहेत. गेल्या पंधरा वर्षा पासून ते एका दिर्घ आजाराने आजारी आहेत. अशा परिस्थितीत देखील अन्याय अत्याचाराची हाळी त्यांच्या कानापर्यत जरी गेली तर हा ढाण्या वाघ अशाही परिस्थीतीत मैदानात डरकाळी फोडायला तत्पर आहे. आंबेडकरी चळवळीची धार बोथट झाली असल्याची खंत त्यांनी ते आज रोजी व्यक्त करीत आहे.प्रार्थना ह्या धर्मनिरपेक्ष भावणांच्या प्रतीक असतात. प्रार्थनेमध्ये सहस्ञ हत्तीचे बळ असते .म्हणूनच आंबेडकरी चळवळीतल्या या नेत्याला निरोगी व दिर्घ आयुष्य लाभो अशी त्या दयाळू तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थणा करतो. झेंडा भला कामाचा तू घेवून निघाला, काटकूट वाटमंधी बोचती त्याला, रगत निघल,तरी बी हसल शाबासतेची,तू चाल पूढं तूला रं गड्या भीती कशाची ।भाई सोमचंद्र दाभाडे यांना क्रांतीकारी जयभीम…* पत्रकार बाबासाहेब जाधव –बुलडाणा- 9422591321