आरोग्य शिबिरात २५० रुग्णांची तपासणी * राजर्षी शाहू मल्टिस्टेट, वन बुलडाणा मिशन व गोदावरी फाऊंडेशनचा उपक्रम

आरोग्य शिबिरात २५० रुग्णांची तपासणी * राजर्षी शाहू मल्टिस्टेट, वन बुलडाणा मिशन व गोदावरी फाऊंडेशनचा उपक्रम

संग्रामपूर
राजर्षी शाहू मल्टिस्टेट, वन बुलडाणा मिशन आणि गोदावरी फाऊंडेशनच्या (जळगाव खानदेश) संयुक्त विद्यमाने ८ जून रोजी संग्रामपूर येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. पुढील उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना १४ जून रोजी जळगाव खानदेश येथे बोलावण्यात आले आहे.

वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी तहसीलदार उकर्डे, माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग इंगळे, माजी नगरपंचायत अध्यक्ष हरिभाऊ राजनकर, श्यामभाऊ वायझोडे, वासुदेव वायझोडे , कलदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात कर्करोग, बालरोग शस्त्रक्रिया, मेंदु-मणका फॅक्चर, हृदयरोग, नेत्रालय, गर्भपिशवी, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, अस्थिरोग, जनरल मेडीसीन, मानसोपचार यासह इतर आजारांवरील तपासणी व औषधोपचार करण्यात आले. संचालन माजी प्राचार्य रमेश राजनकर यांनी केले.

* आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी अडीचशेवर रुग्णांची तपासणी केली. पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव खानदेशला पाठवण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राजर्षी शाहू परिवार कटिबद्ध आहे, असे संदीप शेळके (अध्यक्ष राजर्षी शाहू परिवार) यांनी यावेळी सांगितले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *