हुमणी अळी नियंत्रणाबाबत कृषी विभागाकडून राबविल्या जाते मोहीम…..

हुमणी अळी नियंत्रणाबाबत कृषी विभागाकडून राबविल्या जाते मोहीम…..

खरीप हंगाम पेरणीपूर्वी बियाण्याची प्रतवारी बीजप्रक्रिया व उगम शक्ती मोहिमेनंतर तालुक्यातील सर्व गावांमध्ये हुमणी अळी नियंत्रणाबाबत सामूहिक पद्धतीने हुमणी अळी नियंत्रणाबाबत कृषी विभागाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. हुमणी अळीचे नियंत्रण मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्यानंतर केल्यास प्रभावी नियंत्रण होते तसेच शेतामध्ये लाईट ट्रॅप चा वापर केल्यास हुमणी अळीचे भुंगेरे मोठ्या प्रमाणावर नष्ट केल्या जातात त्यासाठी प्रत्येक गावामध्ये शेतकरी सभा द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. धाड परिसरातील धाड ,धामणगाव ,मासरूळ , गुमी ,मसला ,इरला,बोधेगाव ,सावळी, चांडोळ, रुईखेड मायंबा ,भादोला ,माळ विहीर ,अजितपुर ,नांद्रा कोळी ,हतेडी, दुधा ,देवपूर ,ढाल सावंगी ,पाडळी, अंबोडा, केसापूर ,माळवंडी, दहिद, रायपूर, पळसखेड ,पिंपळगाव सराई सह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये क्षेत्रीय पातळीवर हुमणी आळी नियंत्रणाबाबत प्रभावी मोहीम राबविण्यात येत आहे. मे किंवा जून मध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर प्रौढ भुंगेरे सुप्त अवस्थेतून बाहेर निघतात संध्याकाळच्या वेळी प्रौढ भुंग्यांचे मिलन बाभूळ किंवा कडुनिंबाच्या झाडावर होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी मादी जमिनीमध्ये सहा ते दहा सेंटीमीटर खोलीवर अंडी घालते. एक मादी 50 ते 70 अंडी घालते. अंडी 9 ते 24 दिवसांमध्ये उबतात व त्यातून अळी बाहेर पडते व खरीप पिकांचे नुकसान करते. हुमणी अळी पिकाच्या वाढीच्या वस्तीमध्ये मुळे कुरतडून खात असल्यामुळे सद्यस्थितीत हुमणी अळी नियंत्रणाचा योग्य कालावधी आहे, व सदरील अळीचे नियंत्रण प्रादुर्भाव होण्यापूर्वी केल्यास पिकाचे होणारे नुकसान टाळता येऊन कीटकनाशक खर्चामध्ये बसत होते. त्यामुळे हुमणी अळी नियंत्रण मोहिमेमध्ये सामूहिक पद्धतीने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. वळवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे कोशातून बाहेर पडून बाभूळ कडूनिंब किंवा बोर या झाडांवर अंडे द्यायला सुरुवात करतात त्यामुळे सदरील झाडाखाली लाईट ट्रॅप चा वापर केल्यास प्रभावी नियंत्रण नक्कीच शक्य आहे. तसेच पावसामध्ये खंड पडल्यास ओमनी अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात निदर्शनास येतो त्यामुळे 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पिकांची पेरणी करण्यात येऊ नये असे आवाहन सुद्धा तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *