रायपुर आरोग्य केंद्राच्या कर्मचारी नी रायपुर येथे घरोघरी जाऊन केले सर्वेक्षण

*”जनजागरण मोहीम*

” रायपुर आरोग्य केंद्राच्या कर्मचारी नी रायपुर येथे घरोघरी जाऊन केले सर्वेक्षण
*ग्रामस्थांना दिले आरोग्य शिक्षणाचे धडे*


आज दिनांक .13/ जून /2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत रायपुर येथे मा.डॉ.हरी पवार अति.जिल्हा आरोग्य अधिकारी , मा.एस बी चव्हाण जिल्हा हिवताप अधिकारी, मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एम डी सरपाते व डॉ.शेख उस्मान वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ग्रामीण भागात हिवताप जनजागरण मोहीम राबविण्यात आली .या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिक्षणाचे धडे दिले आहेत. जून महिन्यामध्ये पावसाळ्याची सुरुवात होत. असल्यामुळे हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचून राहत असल्यामुळे डासाची उत्पत्ती होते. या डासामुळे किटकजन्य आजार बळावतात. त्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणिया या आजाराचा समावेश आहे .या आजारावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून या महिन्यात एक दिवस एक कार्यक्रम याप्रमाणे गावागावात कीटक शास्त्रीय सर्वेक्षण जलद ताप सर्वेक्षण राबविण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक ,विकास सुसर,ईश्वर राठोड, दिपक देगलूरकर आरोग्य सेविका श्रीमती. वर्षा थोरात , रूपाली भोसले, शोभा इंगळे, किरण पवार, सुनिता पवार, सुनिता तवर, शिल्पा जाधव अर्चना इंगळे भीमा आराक व आशा स्वयंसेविका श्रीमती. किरण नरवाडे, सविता खिलारे, संगीता लहाने ,साधना गवई, रिता हिवाळे या सर्व आशा यांनी घरोघरी जाऊन पाण्याचे साठे राजण , हौद, पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एक दिवस कोरड्या ठेवण्याच्या सूचना देण्यात दिल्या .याबाबत ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच किटकजन्य आजार होऊ नये ,यासाठी घरोघरी जाऊन रुग्णाचे रक्त नमुने घेण्यात आले. खिडक्या ,कुलर, फुलदाण्या, खराब वापरलेले टायर्स, वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, नारळाच्या करवंट्या तुटलेली खेळणी अडगळीच्या वस्तू इत्यादी मध्ये पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ शकते करिता त्यांना नष्ट करावी वापरात नसलेली रांजने ,माठ ,यांना स्वच्छ कोरडी करून उबडी ठेवावीत जेणे करून त्यामध्ये पाणी जाणार नाही व डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. या सह शौचालयाच्या पाईपला जाळे लावावे.असे सांगण्यात आले.आर एस जाधव आरोग्य सहा ,पी एच मेथे आरोग्य सेवक यांनी कामाचे सुपर व्हिजन केले.तसेच ग्रामस्थांना आरोग्य शिक्षणाचे धडे दिले.
*ताप आल्यास रुग्णांनी* *रक्त तपासायला द्यावे* .
रुग्णांना ताप आल्यास त्यांनी जवळच्या आशा, आरोग्य सेवक किंवा सेविका यांच्या कडे रक्त तपासण्यासाठी द्यावे.त्यामुळे ताबडतोब कीटक जन्य आजारापासून आपल्या कुटुंबाचा व गावाचा बचाव करावा .

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *