चिखलफेक आंदोलन केल्या प्रकरणी : जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

चिखलफेक आंदोलन केल्या प्रकरणी : जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

बुलडाणा
राज्य सरकार विरोधात आंदोलनातून चिखल फेक करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्ह्यांच्या कलम फेकल्या आहेत. जिल्हा काँग्रेसच्या वतीने २१ जून रोजी जयस्तंभ चौकात सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले होते.

या अंदोलनासाठी परवानगी न घेतल्या प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर चिखल फेकला त्यानंतर पुतळ्याचे दहनही करण्यात आले. परवानगी नसतांना व मपोका १९५१ चे कलम ३७(१) (३) लागू असताना हे चिखलफेक आंदोलन केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहूल बोंद्रे, संजय राठोड, प्रा. संतोष आंबेकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील, संजय पांढरे, विनोद बेंडवाल, शैलेश खेडकर, विजय अंभोरे, शैलेश सावजी, अब्दुल जहीर अब्दुल जब्बार, सतिश मेहेंद्रे व इतर दहा ते पंधरा जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *