शाहू महाराज जयंती निमीत्त वंचितच्या वतीने आरक्षण हक्क परिषेद संपन्न 

बुलडाणा

छत्रपती शाहू महाराज जयंती निमीत्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण हक्क परिषेदेचे आयोजन स्कील पॅरेमेडीकल कॉलेज येथे करण्यात आले होते. सर्व प्रथम छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करुण आरक्षण हक्क परिषेदेला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव होते. छत्रपती शाहूंनी दिले आरक्षण, वंचित करील रक्षण हा नारा देऊन उपस्थीतांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी या परिषेदे मध्ये वंचितच्या वतीने ११ ठराव एकमतीने मंजुर केलेत.

 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण हक्क परिषदेतील ठराव यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन पुढे साक्ष देताना भारतात बहुजन समाज म्हणजेच SC, ST, OBC यांना आरक्षणाची मागणी केली होती. शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये १९०२ साली आरक्षण लागू करून एक सामाजिक क्रांती घडवली. राज्यव्यवस्थेमध्ये SC, ST आणि शूद्र यांना प्रशासनामध्ये स्थान नव्हतं. ते स्थान मिळवण्याचा मार्ग शाहू महाराजांनी मोकळा केला. यासाठी शाहू महाराज हे नेहमीच बहिष्कृत आणि नाहीरे वर्गाचे सदैव मार्गदर्शक आणि वंदनीय राहतील. अजूनही या समुहाचा सहभाग सत्तेमध्ये होऊ नये अशी विचारसरणी जिवंत आणि कार्यरत आहे. तेव्हा आरक्षणवादी आणि समतावादी भूमिका नुसती शब्दांनी नाही तर कृतीने सुद्धा sc st आणि शूद्र यांनी अंगीकरली पाहिजे असा ठराव ही परिषद करीत आहे.

 

मायको ओबीसी साठी रोहिणी आयोगाच्या शिफ्फारसी लागू करण्यात याव्यात असा ठराव ही परिषद करीत आहे., SC/ST प्रमाणे OBC ना घटनात्मक आरक्षणाची तरतूद करण्यासाठी संसदीय तसेच न्यायालयीन लढा लढणार असल्याचा ठराव ही परिषद करीत आहे. यासह ११ ठराव यामध्ये घेण्यात आले आहे.

 

याप्रसंगी जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा विधि सल्लागार अमर इंगळे, सम्यक जिल्हाध्यक्ष मोहीत दामोदर, शहराध्यक्ष मिलींद वानखेडे, तालुकाध्यक्ष मनोज खरात, समाधान डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेषराव मोरे, प्रदिप वाकोडे, शेषराव उमाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *