केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव हे आज पहिल्यांदाच बुलढाण्यात आले..यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी बुलढाण्यातील त्रिशरण चौकात पुष्पवृष्टी करत जाधव यांचे जंगी स्वागत केले.. त्रिशरण चौकातील आई जगदंबेच्या माते च्या मंदिरावर जात आरती करून जाधव आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झाले आहे यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.. तर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत मंत्री जाधव यांचे स्वागत केले आहे..तर कारंजा चौकातील भारत मातेला जाधव यांनी अभिवादन केले आहे..यावेळी जाधव यांचे स्वागत म्हणुन 51 तोफांची सलामी देण्यात आली..तसेच बुलढाणा येथील एका लॉन्स वर नागरी सत्कार करण्यात आला आहे..यावेळी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे,माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ युवा नेते मृत्युंजय गायकवाड जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्या सह शेकडो बुलढाणा शहरातील नागरिक या सत्कार सोहोळ्यास उपस्थित होते..