आशियाई ऑलिंपिक मध्ये योगाचा समावेश
* 140 करोड भारतीयांचा हा गौरव : केद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव
बुलडाणा
प्राचीन योग कलेला आशियाई खेळांमध्ये सहभागी करून घेण्यास आशियाई ऑलिंपिक परिषदेने संमती दर्शवल्यामुळे येणाऱ्या ऑलिंपिक खेळामध्ये योगा संदर्भातील प्रात्यक्षिक खेळ दिसणार आहे, ही भारतीयांसाठी गौरवाची बाब असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नाना यश आलं आहे.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतामध्ये योग अभ्यास केला जात आहे. योगामुळे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. या योगाचा अभ्यास भारतासह पाश्चिमात्य देशांमध्येही मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. त्यापासून होणारे फायदे ही त्यांना दिसू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा जावा असं मत मांडलं होतं, त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने पाठिंबा दिला. 2014 पासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती पी.टी. उषा यांनी नुकतीच केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटी दरम्यान प्रतापराव जाधव यांनी आशियाई खेळामध्ये योगाचा समावेश झाला पाहिजे, याबाबत इच्छा प्रगट केली होती. त्या संदर्भाचा प्रस्तावही आशियाई ऑलिंपिक परिषदेच्या कार्यकारी मंडळाकडे ( बोर्डकडे) पाठविण्यात आला होता. या बोर्डाने आशियाई खेळामध्ये योगाचा सहभाग करण्यासंदर्भात सहमती दिली आहे. आता अशियाई ऑलिंपिक परिषदेच्या आमसभेची सप्टेंबर महिन्यात सभा होणार असून या सभेमध्ये मंजुरात मिळाल्यानंतर अशियाई ऑलिंपिक स्पर्धेमध्ये औपचारिक रूपाने योगाला स्थान मिळणार आहे. भारतीय प्राचीन योग कलेला आशियाई ऑलिंपिक स्पर्धेमध्ये समावेश होणे ही 140 करोड भारतीयांचा गौरव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीयस्तरावर योगाला मानाचे स्थान मिळाल्यानंतर येणाऱ्या ऑलिंपिक खेळ प्रकारामध्येही योगाचा समावेश होत असल्या बद्दल केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी समाधान व्यक्त केला आहे.
* भारतीय योग साधनेला : आंतरराष्ट्रीयस्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मान मिळून दिला. योग विषयी पंतप्रधान मोदी यांची असलेली आस्ता लक्षात घेताच योगाला आशियाई ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ही स्थान मिळावं दृष्टीकोनातून केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आशियाई ऑलम्पिक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष रणधीरसिंग यांच्या सोबतही चर्चा केली. योग साधना ही संपूर्ण विश्वामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. योग कलेला आशियाई ऑलिंपिक स्पर्धेमध्ये स्थान देणे गरजे असल्याचं मत व्यक्त केले.