आरटीआय कार्यकता भारत चव्हाण यांच्यावर भर दिवसा प्राणघातक हल्ला..!
एकच मिशन स्वच्छ प्रशासन या ब्रीदवाक्यप्रमाणे प्रशासनातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याच्या प्रकरणामुळे आरटीआय कार्यकर्ता भारत चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज घडली आहे. अज्ञात चार ते पाच जणांनी भारत चव्हाण यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले
शहरातील जिल्हा परिषद मागील चहाच्या दुकानावर आरटीआय कार्यकर्ते भारत चव्हाण हे उभे असताना त्यांच्यावर अचानक चार ते पाच हल्लेखोरांनी डोक्यात व पाठीवर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले हल्लेखोर तोंडावर काळे रुमाल बांधून आले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विकास वाघोदे यांच्यावर देखील वार करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शहरात भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.