वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची घेतली भेट…. दिला आंदोलनाचा इशारा

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची घेतली भेट…. दिला आंदोलनाचा इशारा

मागील दहा दिवसापासून मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबाचे उपोषण सुरू..

 

खामगाव तालुक्यातील घारोड येथील दोन युवकांचा अपघात दर्शवून घडवलेल्या हत्तेचा विशेष पथकामार्फत तपास करून दोशींवर कारवाई करत न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या परिवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मौजे घारोड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील सम्राट रामेश्वर इंगोले वय वर्ष 20 व त्याच्यासोबत त्याचा मित्र अजय प्रल्हाद इंगोले राहणार घारोड हे दोघे मित्रासोबत लाखनवाडा रोडवर 22 मे च्या रात्री साडेआठला शौचालयासाठी बाहेर गेले असता त्यांच्यासोबत त्यांची दुचाकी व मोबाईल सोबत असतान त्यांच्यासोबत 9: 45 ला नातेवाईकांचे फोनवरून बोलणे झाले परंतु रात्री दहाच्या नंतर फोन बंद झाला व दुसऱ्या दिवशी मालगिरी महाराज टेकडी च्या खाली लाखनवाडा रोडवरील नाल्यामध्ये मृतक सम्राट इंगोले व मृतक अजय इंगोले या दोघांचे मृतदेह अत्यंत संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आले दुचाकीच्या अपघातात ठार झाल्याचे ठिकठिकाणी दृश्य प्रसिद्ध करण्यात आले मात्र घटनास्थळावर योग्यरीत्या तपास करण्यात आला नसल्याचा आरोप करत मृतांच्या आई-वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशेष पथकामार्फत तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी याकरिता मागील दहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले  मात्र कुठलीच दखल घेतली जात नसल्याचे पाहत बुलढाणा जिल्ह्यातील बहुजन मुक्ती पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या  पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य सांगितले याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील केली असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी जिल्हाभर आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला

 

 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *