डॉ.संजीवनी शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात..

मुलीत मी माँ जिजाऊ, सावित्रीमाई व रमाबाई पाहते: डॉ.संजीवनी शेळके

बुलढाणा: आईने लावलेल्या मुलींसाठी श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालय हे रोपटे आज महाकाय वटवृक्ष झाले आहे. शाळेतील अनेक मुली आज विविध मोठ्या पदावर काम करीत असून आपल्या संसाराचा आदर्श वसा घेऊन चालवत आहे. त्यांच्यात मी माँ साहेब जिजाऊ, सावित्रीमाई व रमाबाई पाहते, असे गौरवोद्गार मुख्याध्यापीका डॉ.संजीवनी शेळके यांनी अभिष्टचिंन सोहळ्याला उत्तर देतांना काढले.

 

स्थानिक श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.संजीवनी शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळा विद्यालयात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, अदिती अर्बन परिवार, आनंदी परिवार व साधना परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अजित शिरसाट हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना वैशाली तायडे यांनी केली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर, सुरेश चौधरी, पत्रकार राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थितीमध्ये रामेश्वर तायडे, पत्रकार सुरेखा सावळे, काँग्रेसच्या प्रदेश व काँग्रेस उपाध्यक्ष मिनल आंबेकर, नवनिता चव्हाण, ज्योती पाटील मॅडम, अनिता कापरे, शाळेचे मुख्याध्यापक जयंतराव जाधव , प्रा.यु. बी.राजपूत, प्रा.गोपालसिंग राजपूत, प्रा.डॉ.राजेश्वर उबरहंडे, प्रा.इंदुमती ठेंग, चंद्रकांत जोशी, सविता वावरे, उल्हास वाळेकर, गणेशसिंग जाधव, राजेश पाटील, प्रवीण सुरडकर , विलास तायडे , मंगलाताई सपकाळ , प्रा.अरुण पवार, राजेंद्र शिरसाट, बबनराव पवार, मिलिंद मोरे, शिवनारायण गवई, दौलत नरवाडे, गजानन सोनुने यांची उपस्थिती होती. यावेळी सुरेश देवकर यांनी डॉ.संजीवनी शेळके यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व सन्मान चिन्ह देवून त्यांचा यथोचीत सत्कार केला. यावेळी प्रा. बाहेकर, ज्योती पाटील, प्रा. प्रमोद शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार तथा मी बुलढाणेकरचे प्रतिनिधी म्हणून रणजितसिंग राजपूत यांनी हजेरी लावून आपल्या शेरो शायरीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेशसिंग जाधव यांनी परिश्रम घेतले. आभार सुलभाताई पंडित यांनी मानले

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *