एसटी महामंडळात दर सोमवार- शुक्रवारी प्रवासी राजा दिनाचे आयोजन

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे १५ जुलै २०२४ पासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचनांचे स्थानिक पातळीवर निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवार आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे.

 

सदर उपक्रमात विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशी आणि परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील, तसेच तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

 

 

 

बुलडाणा विभागातील आगारामध्ये सातही आगारात प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. बुलडाणा आगारात सोमवार १५ जुलै २०२४, चिखली येथे शुक्रवार १९ जुलै २०२४, खामगाव येथे सोमवार २२ जुलै २०२४, मेहकर येथे शुक्रवार २६ जुलै २०२४, मलकापूर येथे सोमवार २९ जुलै २०२४, जळगांव जामोद येथे शुक्रवार २ जुलै २०२४, शेगाव येथे सोमवार ५ जुलै २०२४ कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

 

सदर प्रमाणे परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी ३ ते सांयकाळी ५ दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

 

प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *