शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पिकवीम्याची पैसे जमा करा

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे बाकी त्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा करावेत असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

 

बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मंजूर झाली आहेत. सन २०२३-२४ खरीप हंगामात अंतर्गत जिल्ह्यातील २,४२,१३४ शेतकऱ्यांना १६१,८६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली होती, त्यापैकी ६,७८७४ शेतकऱ्यांना ३८.३८ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई वितरित करण्यात आले आहे. त्यातील १,७४,२६० शेतकऱ्यांना १२३.४८ कोटी रुपयाची नुकसान भरपाई देणे प्रलंबित आहे. तर रब्बी हंगामात ७५, १०५ शेतकऱ्यांना १०१.०९ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्यातील ९२८२ शेतकऱ्यांना १२.९३ कोटी रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आले असून ६५८२३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करणे अजून बाकी आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसान भरपाईचे पैसे वर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना व कारवाई करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना दिले आहेत.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *