बुलडाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बँकेस  300 कोटी सॉफ्ट लोन मंजूर *  बँकेची स्थिती सुधारण्यास होणार मदत

बुलडाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बँकेस  300 कोटी सॉफ्ट लोन मंजूर

*  बँकेची स्थिती सुधारण्यास होणार मदत
बुलडाणा 
         शेतकऱ्यांची हककाची बँक अशी ओळख असणाऱ्या ‘जिल्हा बँकेस’ शासनाने मदतीचा हात दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँक आर्थिक दुर्बल झाली होती. बँकेला सॉफ्ट लोन मिळावे यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होते. बँकेची स्थिती खालावल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वितरणावेळी झाला होता. परंतु आता पेरणीच्या वेळी बँकेला घसघशीत तीनशे कोटीचे सॉफ्ट लोन मिळाल्याने बळीराजासाठी ही शुभ वार्ता ठरली आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. 
 
   जिल्हा बँकेने आर्थिक स्थिति सुधारणे साठी 300 कोटीचा सॉफ्ट लोन मिळणे बाबतचा प्रस्ताव राज्य शासनास दिनांक पाठविला होता. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये राज्य सहकारी बँकेने बुलडाणा जिल्हा बँकेस सॉफ्ट लोन द्यावे अशा स्वरूपाचा रूपांतरित झाला होता.
 
* राज्यातील पहिली बँक ठरली : 
      मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 मार्च रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार, बुलडाणा जिल्हा बँकेची आर्थिक स्थिति विचारात घेऊन, बँकेच्या प्रगतीचे अवलोकन करता, बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून  300 कोटी सॉफ्ट लोन उपलब्ध होण्यासाठी शासनाने थकहमी घेतली आहे. या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अथक प्रयत्नाने अशा प्रकारचे शासन हमीवर, राज्य बँकेकडून सॉफ्ट लोन मिळणारी बुलडाणा जिल्हा बँक ही राज्यातील पहिली बँक ठरली आहे.
 
* कर्ज वाटपाचे धोरणही ठरले :
      शासनाने हमी घेतल्यानंतर, बुलडाणा जिल्हा बँकेस राज्य सहकारी बँकेच्या दिनांक 29-06- 2024 रोजीच्या मंजूरी पत्रानुसार  300 कोटी सॉफ्ट लोन मंजूर केले आहे. सदर मंजूर कर्जापैकी बँकेने सुरवातीस राज्य बँकेकडून  5 कोटी उचल केलेला असून, या रक्कमेचे योग्य प्रकारे नियोजन करून बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेने सुरक्षित कर्जवाटपाचे धोरण ठरविले आहे.
 
* असे राहील कर्जवाटप : 
        पगारदार नोकरांसाठी (ST/MT/OD) इ., सोनेतारण कर्ज, पगारदार नोकरदारांच्या पतसंस्थांना कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/एम.एस. आर. एल. एम. एन. एल. एम.7) बचत गट/ सूक्ष्म कर्ज पुरवठा / इतर शासकीय कर्ज योजनांतर्गत कर्ज पुरवठा, कॅश क्रेडिट कर्ज, शेती व बिगर मध्यम मुदत कर्ज (गोडावून/वैयक्तिक इ.) वरीलप्रकारच्या योजनेअंतर्गत बँकेने कर्ज वाटप सुरू केले आहे. या विविध प्रकारच्या कर्जवाटपामुळे बँकेस निरनिराळे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहेत. व बँकेच्या उत्पन्नात वाढ होऊन बँकेचा संचित तोटा कमी होण्यास मदत होऊन बँक पूर्वपदावर येणार आहे.
 
* कर्ज योजनेचा लाभ घ्या – डॉ.खरात*
        जिल्ह्यातील सर्व कर्जदार तसेच ठेवीदार, संस्थांना आवाहन करण्यात येते की, आपल्या जास्तीत जास्त ठेवी बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेत ठेवाव्यात व बँकेच्या वरील नमूद निरनिराळ्या कर्ज योजनांचा लाभ घेवून बँकेशी व्यवहार वाढवावा. असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अशोकराव खरात यांनी केले आहे. 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *