*राजुर घाट वळण रस्ता, बुलढाणा रिंग रोड प्रश्न लागणार मार्गी* आ. गायकवाड यांनी घेतला आढावा

*राजुर घाट वळण रस्ता, बुलढाणा रिंग रोड प्रश्न लागणार मार्गी*

आ. गायकवाड यांनी घेतला आढावा

बुलढाणा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महत्त्वाचे असलेले राजुर घाट वळण रस्ता व बुलढाणा रिंग रोड या दोन प्रश्नालां मार्गी लावण्याच्या कामाला वेग आला आहे. यासंदर्भात नुकतेच
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित अधिकारासोबत आढावा बैठक घेतले व विविध सूचना दिल्या. सदर बैठक ही आमदार संजय गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.

बुलढाणा ते मोताळा मार्गावर असलेला राजुर घाटात वळण रस्ता हा लहान असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ व ट्रॅफिक असते परिणामी वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो सदर वळण रस्ता हा जाण्यासाठी व परत येण्यासाठी दुसरा मार्ग तयार करण्यात यावा या संदर्भात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्याने या विषयावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते या आदेशाच्या अनुपालन होऊन संबंधित अधिकाऱ्यांना बैठका घेण्याच्या आदेश दिले होते पश्चात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत या विषयाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची विशेष बैठक मातोश्री संपर्क कार्यालय येथे नुकतेच पार पडली यावेळी यामध्ये सदर मार्गासाठी अंतिम सर्वेक्षण इस्टिमेट करण्याचे आदेशही त्यांनी दिले

बुलढाणा शहराला लागून असलेला रिंग रोड चे काम पूर्ण झाल्यावर शहरातून होणारी वरदळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

यावेळी बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष राऊत उपविभागीय अभियंता राजेश एकडे आदी मान्यवर उपस्थित होते

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *