जम्मु काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा येथे शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र निषेध.

जम्मु काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा येथे शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र निषेध.

बुलढाणा
जम्मु – काश्मीर मधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश यांच्यासह २ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने *शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत*यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील चौकात तीव्र निषेध करण्यात आला. तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरली असल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला काश्मीर है हिंदुस्थान का, नाही किसी के बाप का, हिंदुस्थान जिंदाबाद , केंद्र सरकार निषेध असो निषेध असो या घोषणा देत काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी उप तालुका प्रमुख विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, संजय गवळी, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, आशिष बाबा खरात, युवासेनेचे उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, श्याम खडके, सरपंच रामेश्वर बुधवत, भगवान नरोटे, समाधान जाधव, राहुल जाधव, दुर्गादास नाटेकर, उमेश नाटेकर, शफीक बागवान, अमोल जुमडे, अशोक महाराज, अनिल राणा, संभाजी शिंदे, वीरेंद्र बोर्डे, सचिन मिसाळ, सचिन पाटील, रामेश्वर शिंदे, बबन खरे, मधुकर महाले, श्रीनाथ इंगळे, रामेश्वर शिंदे, सोमनाथ शिरसाठ, शिववसिंग कवाळ, महादू गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *