‘लोकमंच् बुलडाणा ‘ चे दिवंगत साहित्तिकांना अभिवादन..

‘लोकमंच् बुलडाणा ‘ चे
दिवंगत साहित्तिकांना अभिवादन..

अण्णाभाऊ साठे यांचे विचार नवीन पिढीत रुजवणे गरजेचे –  डॉ. शोन चिंचोले

बुलडाणा

अण्णाभाऊ साठे यांचे विचार विविध अंगी आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून या शिवभक्तने रशियामध्ये गायला. प्रचंड मोठ्या साहित्याची निर्मिती केली. यातून शोषित वर्गाचे दुःख त्यांनी मांडलेच आहे पण त्याच बरोबर मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमानही जपला. त्यांचे विचार तरुण पिढी पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. असे मत ‘लोकमंच’  बुलढाणा चे अध्यक्ष डॉक्टर  शोन चिंचोले यांनी व्यक्त केले.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व दिवंगत ज्येष्ठ लेखक जी ए.उगले यांना लोकमंच परिवाराच्या वतीने चिंचोले चौक येथे आज अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर शोन चिंचोले होते.तर कार्याध्यक्ष सुनील सपकाळ,संयोजक गणेश निकम, डी  आर इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सिंग राजपूत,शिक्षक गणेश बस्सी, पत्रकार सोहम घाडगे,संजय खांडवे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर शोन म्हणाले –
अण्णाभाऊ साठे यांचे नाव जरी उच्चारले तरी अभिमानाने उर भरून येतो. सामान्य परिस्थितीतून आलेले हे व्यक्तिमत्व जगाच्या काण्याकोपऱ्यामध्ये विस्तारित झाले. धर्म, प्रांत,सीमा वादाची सर्व बंधने तोडून त्यांनी मानवतावादी नवा विचार दिला. हा विचार नवीन पिढीमध्ये रुजला पाहिजे. असे सांगून त्यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकला. तर अण्णाभाऊ साठे म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर व्यक्तिमत्व असून त्या नावाशिवाय मराठीचे दालन पूर्णच होऊ शकत नाही असे सुनील सपकाळ यांनी प्रस्तविकामधे वोघवत्या भाषेत मांडले व  अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय दिला.
सुरेश साबळे यांनी अण्णाभाऊ साठे व दिवंगत साहित्यिक जीए उगले यांना आदरांजली व्यक्त केली. जी. ए .उगले यांनी मराठी साहित्यामध्ये दिलेलं महत्त्वपूर्ण योगदान यावर ते बोलले. तर अण्णाभाऊ साठे यांचा विचार हा महाराष्ट्र घडवणारा विचार असल्याचे साहित्यिक साबळे म्हणाले.
या नंतर सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
संचलन गोपालसींग राजपूत तर आभार संजय खांडवे यांनी मानले.कार्यक्रमास डॉक्टर सचिन किनगे, पंजाबराव गायकवाड, अमोल रिंडे, राजेश शेळके ,एडवोकेट गणेश सिंग राजपूत,पत्रकार शौकत शहा, उत्तमराव बाजड ,विक्रम राठोड, धनंजय चाफेकर, संजू कटाळे, अमोल राजपूत ,विठ्ठल ठेंग, चेतन प्रधान, हिम्मत बस्सी, आर जी जोगदंड ,सुरेश सरकटे,विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते.

*अण्णाभाऊंना भारतरत्न द्या*

*अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर साहित्याची सेवा केली. अण्णाभाऊंची सकस लेखनी जागतिक तोडीच्या लेखकांमध्ये आहे. अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही तर ते देश व्याप्ती व्यक्तिमत्व असल्याने त्यांना सरकारने भारतरत्न द्यावे अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ यांनी केली.*

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *