अतिक्रमणधारकांच्या संरक्षणासाठी आझाद समाज पार्टी आक्रमक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
आपल्या पोटाची खळगी व कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी शासनाच्या ई क्लास जमिनीवरती अतिक्रमणधारकांनी, गेल्या 60 ते 70 वर्षापासून अतिक्रमण करून. ती जमीन पेरण्यालायक व सुपीक करून त्यावरती पीक पिकवीत आहेत,मात्र गेल्या वर्षभरापासून या जमिनीवरती शासनाने सौर कृषी वाहिनी प्रकल्प योजना राबविली आहे. या योजनेने गोरगरीब कष्टकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आज दिनांक 20 जुलै 2024 ला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे(कांशीराम) जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले व निवेदनामध्ये शासनाला आक्रमक स्वरूपात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आज चिखली तालुक्यातील 125 गावांमध्ये सदर प्रकल्प योजना राबवण्याचे आदेश देण्यात ,येत असून. मौजे अन्वी तालुका चिखली या गावांमध्ये हा प्रकल्प ग्रामपंचायत च्या संमतीने अन्यायपूर्वक राबविण्यात आला आहे .त्यामुळे या निवेदनामध्ये ज्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने ग्रामपंचायत च्या संमतीने बळकावल्या आहेत. त्या जमिनी त्वरित या अतिक्रमणधारका च्या ताब्यात देण्यात याव्या अन्यथा आझाद समाज पार्टी जिल्हाभरातील अतिक्रमणधारक आक्रमक स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखडे यांच्या माध्यमातून देण्यात आला. निवेदन देतेवेळी भाई संदीप इंगळे पत्रकार सागर समंदूर, अतिक्रमण धारक उत्तम घेवंदे ,रामदास घेवंदे, गुंफाबाई घेवंदे, भीमराव घेवंदे, कमल घेवंदे ,गौतम घेवंदे , सोहन घेवंदे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.