नागरीकांनी देहदान व अवयवदान करण्यासाठी पुढे यावे … केद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन…
बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेच्या १२५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अवयवदान संकल्प..
अवयवाची आवश्यकता असणाऱ्या गरजुना आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थाना अभ्यासासाठी देहदान आणि अवयवदानाचा फायदा होतो तेव्हा प्रत्येक नागरीकानी आपल्या कुंटुबाला विश्वासात घेवून देहदान आणि अवयव दानासाठी पुढे यावे असे आवाहन केद्रीय आरोग्य व कुटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केल
बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्यावतीने 19 जुलैला सहकार सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते ते पुढे म्हणाले सहकारची ताकद मोठी आहे सहकाराच्या माध्यमातुन सर्वसामान्यानाही विकास साधता येता सहकाराचा उपयोग समाजहोतासाठी झाला पाहिजे असे ते म्हणाले . या मेळाव्यात बँकेच्या १२५ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला. आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्याकडे अवयवदानाचे फॉर्म सुपूर्द केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकमाला आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आमदार धीरज लिंगाडे, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, तोताराम कायंदे उपस्थित होते. बँकेला मिळालेले 300 कोटी रुपयाचे सॉफ्ट लोन आणि यातून जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त होणार असल्याचे आमदार डॉ राजेद्र शिगणे यांनी सांगीतले या कार्यक्रमाला जिल्हा केद्रीय बँकेचे सभासद भागधारक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते…