कुलवामा घटनेतील शहीद कुटुंबांच्या हस्ते लोकार्पण केलेल्या संविधान प्रस्ताविकेची पुनरस्थापित करा … मुख्यमंत्री यांना निवेदन
बुलढाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकात जिल्हा परिषदेच्या जागेवर दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी नियमाकोल व सर्व बाबींची पूर्तता करून भारतीय संविधान प्रस्ताविकेचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने व जनमानसात संविधान संस्कार रुजवणे तसेच नागरिक हे संविधान साक्षर व्हावेत या दृष्टीने संविधान प्रस्ताविका स्थापित करण्यात आली होती.
संविधान प्रति उदात्त भावनेतून जिल्ह्याचे सुपुत्र शहीद संजय राजपूत व शहीद नितीन राठोड या वीर जवानांना समर्पित करण्याकरिता व त्यांच्या स्मृती आपल्यात चिरकाल राहण्यासाठी स्मृती म्हणून वीर पत्नीच्या शुभ हस्ते संविधान प्रस्ताविकेचे लोकार्पण करण्यात आले होते.आज रोजी गौरवानवीत करणाऱ्या शहिदांच्या स्मृती व साक्ष देणारी शीळा आणि संविधान प्रस्ताविका सदर जागेतून नसतेनाबूत करण्यात आली असल्याचा आरोप करत सदर संविधान प्रस्ताविका पुनरस्थापित करण्याकरिता अमरण उपोषण आंदोलने करण्यात आली परंतु प्रशासनाने कुठलीच कार्यवाही न केल्याने पुढे येऊ घातलेल्या 1 सप्टेंबर 2024 रोजी या लोकार्पण सोहळ्याच्या घटनेला 5 वर्षे पूर्ण होत आहेत येत्या 1 सप्टेंबर 2024 पर्यंत नियोजित जागेवर संविधान प्रस्ताविका पुनरस्थापित न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनावर आशिष खरात, गजानन ससाने, अनिल डोंगरदिवे, प्रशांत घेवंदे, अनिल बावस्कर किशोर सुरडकर, वीरेंद्र बोर्डे, राजेंद्र शेळके, गणेश सोनवणे, शंकर हिवाळे, संदीप बोर्डे, विनोद गवई, संतोष पवार, राजेश गवई, यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत