सहकार विद्या मंदिर येथे कारगिल विजय दिवस साजरा

बुलडाणा 
       २६ जुलै हा दिवस आपल्या देशात कारगील विजय दिन म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो , यावर्षी हा दिवस बुलडाणा अर्बन परिवार व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांनी २६ जुलै २०२४ रोजी सहकार विद्या मंदीराचे सांस्कृतिक हॉलमध्ये संयुक्तविद्यमाने संपन्न झाला.
       २६ जुलै १९९९ रोजी आपल्या देशाच्या सैन्याने कारगील युध्दात विजय मिळविला होता, तेव्हापासुन २६ जुलै हा दिवस कारगील विजय दिन म्हणुन आपल्या देशात मोठ्या प्रमपणात साजरा केला जातो. यावर्षी २६ जुलै २०२४ रोजी या विजयी दिनाला २५ वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन हा दिवस बुलडाणा अर्बन परिवार व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांनी संयुक्तपणे साजरा केला. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता हुतात्मा गोरे स्मारक येथे हूतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन व मानवंदना देवुन करण्यात आली. याप्रसंगी शौर्य चक्र विजेते रमेश बाहेकर, सेना मेडल विजेते रामदास वाघ यांचेवतीने त्यांचे सुपुत्र सुरेश वाघ, बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेशजी झंवर, अपर जिल्हाधिकारी  सदाशिव शेलार , कर्नल सुहास जतकर संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, स्काॅडून लिडर डॉ. रुपाली सरोदे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलडाणा व तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली.
       शहीद सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली तहसिल चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, एडेड चौक व चिखली रोडने सहकार विद्या मंदीर चे सांस्कृतिक हॉल येथे रॅलीचे समापन करण्यात आले. सहकार विद्या मंदीराचे प्रांगणात बसविण्यात आलेल्या व कारगील युध्दात कामगिरी बजावलेल्या मिग-२१ विमान, रणगाडा व अँकरला मान्यवर संजयभाऊ गायकवाड आमदार बुलडाणा, धिरजजी लिंगाडे विधान परिषद सदस्य, बुलडाणा, राधेश्यामजी चांडक अध्यक्ष बुलडाणा अर्बन परिवार, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिलजी कडासने, अपर पोलीस अधिक्षक महामुने, सौ. कोमलताई झंवर अध्यक्षा बुलडाणा अर्बन चॅरीटेबल सोसा.यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याच कार्यक्रमाचे निमित्ताने युध्दातील विविध शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.     
        सदर प्रदर्शनी सामान्य नागरीकांना व शालेय विद्यार्थ्यांना पहाता, यावी यासाठी दुपारी १०.३० ते ४ या वेळेत खुले ठेवण्यात आले होते. सदर प्रदर्शनीला उपस्थितांशिवाय सहकार विद्या मंदीरातील विद्यार्थी तसेच बुलडाणा कॅम्ब्रीज स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी प्रदर्शीनीला भेट दिली.
       या दिनाचे औचित्य साधुन जिल्हयातील विरनारी व विर योध्दयांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, साडी/ड्रेस देवुन व मानपत्राचे वाचन करुन सन्मान करण्यात आला .याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तावीक बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी केले. त्यांनी कारगील युध्द प्रसंगीच्या घटनांची विस्तृत माहिती विषद केली व देशाच्या सिमेवर सैनिक अहोरात्र पहारा देवुन देशाचे रक्षण करतात व त्यामुळेच आपण सुखाने जगतो तेव्हा सैनिक व देशासाठी बलीदान करणारे शहीदांप्रती आपण संवेदनशिल असणे गरजेचे आहे. त्यांच्या अडीअडचणी समजुन घेवुन त्यांना मदत करणे, आपले आद्य कर्तव्य असले पाहीजे, असे नमुद केले. तर आमदार संजय गायकवाड यांनी सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त करतांना बुलडाण्यात सैनिकी रुग्णालय व सैनिक भवन लवकरच निर्माण करणार असुन त्या माध्यमातुन सैनिकांची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला. तर आमदार धिरज लिंगाडे यांनी सैनिकांची कर्तव्य तत्परता व मातृभुमी प्रती असलेले प्रेम व त्यातुन निर्माण होणारी राष्ट्रभक्ती विषद करुन तशी शिस्त सामान्य नागरीकांमधे असावी व तसे प्रशिक्षण प्रत्येकाला अनिवार्य करणे काळाची गरज असल्याचे नमुद केले.
     याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिलजी कडासने यांनी सैनिकांप्रती असलेला आदर आपल्या शायरी व गझलच्या माध्यमातुन व्यक्त केला व उपस्थितांना गंभीर व संवेदनशील विषय आपल्या शैलीने विषद करुन उपस्थितांची मने जिंकली. ज्ञानेश्वरीतील पसायदान, कुराणातील आयात यातील दाखले देवुन सर्वांचा ईश्वर एकच आहे तर आपण आपसात देश का करावा, असे सांगुन मैं तो अमन पसंद हुं , मेरे शहरसे दंगो को रहे दो ,लाल और हरे में मत बांटो मेरे छत पे तिरंगा रहने दो असे मत व्यक्त करुन शहीदांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कर्नल सुहासजी जतकर, संचालक ,सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी केले. यावेळी बुलडाणा पोलीसांच्यावतीने बिगुल वाजवुन शहीदांना मानवंदना देण्यात आली. तसेच पोलीस दलाच्यावतीने पोलीस बॅण्डवर राष्ट्रगीत म्हणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा चे अधिकारी ,कर्मचारी तसेच सुभेदार मेजर शेळके, सुभेदार मेजर नेमाने, सुभेदार मेजर सुरेश खंडारे, गुलाब मिसाळ, हवालदार अनिल डोंबरदिवे तसेच बुलडाणा अर्बन व सहकार विद्या मंदीराचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *