पालकमंत्री काका आम्हाला न्याय द्या चिमुकलीचे पालकमंत्री वळसे पाटील यांना पत्र….
सागवान येथील निलेश दत्तू डुकरे या युवकाने दिनांक 21 जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या चा प्रयत्न केला होता. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा 23 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला
निलेश याचे खिसे पाहिले असता त्याच्या लोअरच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली त्या चिठ्ठीतील मजकुरावरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 653/2024 कलम 108, 49,3 (5) भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार आरोपी मनोज चंदन राहणार सुंदरखेड, आरोपी अनिल बाबुराव जाधव राहणार जुना गाव अजितपुर रोड सागवान बुलढाणा,व विलास चिंचोले राहणार बुलढाणा यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
दिनांक 23 सात 2024 रोजी दाखल झालेल्या या पुण्यातील आरोपी अद्यापही फरार असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी याकरिता मृतकाच्या बारा वर्षीय मुलींनी लिहिले पालकमंत्री वळसे पाटील काका यांना पत्र या मुलीने लिहिले आहे की मी आपणास विनंती करते की माझे वडील आम्हाला सर्वांना सोडून गेले आम्ही एकटे पडलो आमच्या मागे काका आणि बाबाच आहेत माझे वडील गेल्यामुळे माझ्या आईच्या डोक्यात फरक पडल्यासारखे झाले आहे मी बारा वर्षाची आहे माझी आई वडिलास एकटी आहे.
वळसे पाटील काका मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे कृपया मला आणि माझ्या आईला न्याय मिळावा अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे.
अशी विनंती एका पत्राद्वारे पालकमंत्री यांच्याकडे या मुलीने केली आहे यावर आता या आरोपींना अटक करण्यासाठी व या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावलं उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे