शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून थकीत पिक विम्याचे पैसे द्या -राहुलभाऊ बोंद्रे

भाजपा सरकार चे धोरण, शेतकऱ्यांचे मरण…

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून थकीत पिक विम्याचे पैसे द्या -राहुलभाऊ बोंद्रे

चिखलीत तहसीलवर धडकला कॉंग्रेस चा मोर्चा

चिखली दिनांक २६ जुलै २०२४

केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांचे मरणास कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करून थकीत पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे, या व इतर विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात. असे प्रतिपादन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी या वेळी केले. चिखली तालुका कॉंग्रेस च्या वतीने आज दिनांक २६ जुलै रोजी तहसील कार्यालयावर मोटार सायकल रेली काढून धडक देत घेराव आंदोलन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर,शहराध्यक्ष अतहरोद्दिन काझी,शहर कार्यध्यक्ष निलेश अंजनकर,माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी जयस्तंभ चौकातील जनसेवा कार्यालय येथून बाजार गल्ली नगर परिषद मार्गे डफडे वाजवत, झेंडे,मागण्या फलक, हातात घेत कॉंग्रेस आंदोलक चिखली तहसील वर धडकले या प्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. यावेळी बोलताना राहुलभाऊ बोंद्रे पुढे म्हणाले शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे,शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळालेच पाहिजेत या व इतर घोषणांनी परिसर दनाणून सोडला होता. तहसीलदार चिखली यांना चिखली तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे या व इतर मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.अत्यंत जीवघेण्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. अशा दुहिरी पाटाच्या परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील ६ महिन्यात राज्यात १७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य इत्यादी मध्ये प्रचंड महागाई झालेली आहे. शेतकऱ्यांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्या संदर्भात इतर पदाधिकाऱ्यांची समयोचित भाषणे झाली.

सदर निवेदन देते वेळी खवीस चे अध्यक्ष ईश्वर इंगळे,विजय पाटील शेजोळ,सरपंच मनोज लाहुडकर,गणेश जवंजाळ,समाधान गीते,नासेर सौदागर,डॉ.इसरार,रफिक सेठ, चांद मुजावर,किशोर साखरे,नगरसेवक गोकुळ शिंगणे,सचिन शेटे,राहुल सवडतकर,माजी सैनिक जगन्नाथ वाघ, दीपक थोरात,दीपक खरात,जक्का भाई, भाई प्रदीप अंभोरे,राजू रज्जाक,शिवराज पाटील,प्रदीप पचेरवाल, परशराम राठोड,प्रकाश राठोड,भास्कर चांदोरे,दत्ता करवंदे,रामभाऊ भुसारी,प्रदीप चिंचोले,दत्तात्रय येवले,विष्णू खंबाइतकर,रोहन करंडे,सचिन बडगे,भारत गायकवाड,परमेश्वर साळवे,अंबादास चिंचोले,संतोष परिहार,सत्यनारायण जवंजाळ,दामोधर परिहार,जगन्नाथ जाधव,दिलीप दहातोंडे,प्रकाश चव्हाण,कैलास कांडेलकर,विशाल गायकवाड,मनोज जाधव,विठ्ठल शेळके,बळीराम हाडे,नानाभाऊ पंखुले,राहुल व्यवहारे,सतीश शिंदे,खलिल बागवान,दिलीप पाटील,बबलू शेख,शेख जाकीर,शकील खान,अजीम खान,भगवान गायकवाड,प्रभू येवले,अमोल मोरे,विठ्ठल सोनुने,अश्विन जाधव,रोहन पाटील,मोहन चव्हाण,प्रल्हाद इंगळे,पवन गवारे,भिकाजी पाटील,दिनकर पडघान,शनी संजय पांढरे,बाळू सलोक,विलास चव्हाण,शेख साबीर,अनिल राठोड,गणेश चव्हाण,शिवलाल चव्हाण,प्रकाश तायडे,संतोष भुतेकर,प्रमोद कोल्हे,जगन्नाथ कांबळे,व्यंकटेश रिंढे,शिवराज पाटील,पवन पाटील,राहुल जाधव,संजय गिरी,संजय सोळंकी,रवींद्र परिहार,प्रदीप वाघ,अजीम शेख,सतीश काळे,बद्रीनाथ कापसे,शेख असिफ,संतोष आटोळे,किरण लोखंडे,शिवम तायडे,काळे साहेब,तोंडे मामा,विजय राउत,विजय निकम,अन्सार भाई,गणेश ठेंग,आकाश गाडेकर,समाधान आकाळ,दीपक खडके,देविदास लोखंडे,प्रदीप साळवे,बुढन भाई,राजेंद्र सुरडकर,दिनेश दांदडे,चंदन चव्हाण,नंदू पाटील,अनिल किलबिले,गुलाब अंभोरे,रामेश्वर कताडे,अकिल खान,शिवशंकर तायडे,रफिक शेख,दिलीप परिहार,किशोर राठी,वैभव शेळके,प्रमोद वाघ,मो.मुख्तार. आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – राहुलभाऊ बोंद्रे

नैसर्गिक आपत्ती मुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना थकीत पिक विमा तात्काळ मिळावा यासाठी जिल्ह्यातील १०४२८०१ एवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र ७७१५६ शेतकऱ्यांना ५१.३२ कोटी रु वाटप करण्यात आले पैकी उर्वरित शेतकऱ्यांना पीकविम्याची २२१.२६ कोटी रु नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे. म्हणजेज २२४९९२ शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहले आहे, खत बियाणे अन मशागतीसाठी लागणारे यंत्र साहित्य बाजार भावात नियमित वाढ होत आहे या तुलनेत शेतकऱ्यांच्या उत्पादित शेत मालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यातच दिवसेंदिवस महागाई ने उच्चांक गाठला असून महाविज वितरण कडून झालेली वीज दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारीच असल्याचे प्रतिपादन यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *