ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणीच्या आवश्यक उपाययोजना करा
* राशन दुकानदारांची पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलडाणा
ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत. परंतु मागील दोन महिन्यापासून ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्वर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक
अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही यामुळे 29 जुलै रोजी स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहेत की, महाराष्ट्र राज्यात साधारण 52 हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर सन 2018
पासून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत. परंतु मागील दोन महिन्यापासून ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्वर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक
अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही. त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आणि मोल-
मजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत राहावे लागते. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध असून देखील धान्य वितरण करू शकत नाहीत. याबाबत तालुका स्तरापासून जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर अनेक वेळा तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारे
सकारात्मक उपाययोजना न झाल्यामुळे पुढील काळात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आपापल्या तहसील कार्यालयात ई-पॉस मशीन जमा करतील असा निर्णय घेण्यात आला तसेस 25 जुलै, 2024 रोजी प्रधान सचिव, यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर कोणताही समाधानकारक तोडगा व निश्चित आश्वासन न निघाल्याने महासंघाला अत्यंत नाईलाजाने हा निर्णय घेणे भाग पडत आहे. 31 जुलै 2024 पर्यंत शासनाकडून या ई-पॉस मशीनच्या संदर्भात ठोस निर्णय तसेच आवश्यक उपाययोजना न झाल्यास राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार जुलै महिन्याचे धान्य वितरण बंद झाल्यानंतर 5 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या ई-पॉस मशीन आपापल्या तहसील कार्यालयात जमा करतील, याबाबत जुलै महिन्यातील बाकी असलेले धान्य वाटप ऑगस्ट पुर्ण महिन्यात कैरी- फॉरवंड वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी किंवा आजच पर्यायी व्यवस्था लाभार्थी बंचित राहू नये म्हणून ऑफ लाईन धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात अशी मागणी निवेदन द्वारे केली आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष विश्वास पाटील, रंगरावजी देशमुख, मोहन जाधव, सुनील बर्डे, सय्यद आसिफ सह अन्य राशन दुकानदार उपस्थित होते.