मा. मुकुलजी वासनिक साहेब यांच्या नेतृत्वात पुन्हा काॅग्रेसच्या प्रवाहात व प्रवासात मा.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी प्रवेश…
विद्यार्थी दशेपासुनच मला काॅग्रेच्या व मा. मुकुलजींच्या विचारांचे व नेतृत्वाचे आकर्षण होते…
आमचे मामा प्रा डॉ संतोष आंबेकर व मामी प्राचार्य मिनल आंबेकर तसेच आमचे मित्र तथा मार्गदर्शक विजुभाउ अंभोरे ,वडील प्रा.नारायणराव गावंडे यांच्या विचारांचे व कार्याचे संस्कारही तसेच होते.त्यातुनच माझे व्यक्तिमत्व घडले….
म्हणुनच युवा अवस्थेत नेहमीच काॅग्रेस पक्षाचे काम करण्यात अग्रेसर होतो.त्यातुनच युवक काँग्रेस अध्यक्ष , जिल्हा काँग्रेस समिती, काँग्रेस सोशल मीडिया सारख्या महत्वाच्या पदावर उत्कृष्ट काम करण्याची संधी व जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहेच.. परंतु स्वतःच्या वाढत्या राजकीय व सामाजिक प्रभावामुळे माझी कुचंबना झाल्याची भावना निर्माण झाली.त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाकांक्षी कार्य व प्रगती , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, अभ्यास मंडळ सदस्य व अभ्यास मंडळ अध्यक्ष , महाराष्ट्रातील व इतर राज्यातील संशोधन अधिमान्यता समिती (RRC) वरील सदस्य, संशोधक, मार्गदर्शक मार्गदर्शक (Research Guide & Research Valuar )व संशोधन तज्ञ मुल्यांकन प्रोफेसर व विशेष म्हणजे विद्यापिठ अनुदान आयोग पुरस्कृत राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती समिती (NAAC) वरील तज्ञ म्हणून देशातील विविध वरीष्ठ महाविद्यालयांच्या मुल्यांकनासाठी तज्ञ सदस्य म्हणून भेटी देणे अशा विविध प्राधीकरणावर अभ्यासु प्राध्यापक व पुढे अभ्यासु प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली .
सामाजिक व शैक्षणिक कार्या बरोबरच माझा मुळ पिंड राजकीय आहे. त्यामुळे चिखली नगरपालिकेत सर्वाधिक मतांनी विजयाचा विक्रम, न.पा. मध्ये शिक्षण सभापती म्हणून काम करणे अशा अनेक राजकीय जबाबदाऱ्या पार पडल्या. शैक्षणिक क्षेत्रात राज्य पातळीवर काम करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शिक्षक आघाडीची स्थापना केली.त्यात काम केले व महाराष्ट्र विधानपरिषदेची शिक्षक मतदार संघाची निवडणुकही जिद्दीने स्वबळावर लढविली.त्यामुळे या काळात काँग्रेस मध्ये सक्रीय नव्हतो.
परंतु देशातील, महाराष्टातील युवक , युवतींची बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, शेतकरी शेतमजूरांचे प्रश्न, सरकारी शाळांची व महाविद्यालयांची शासनाच्या दुर्लक्षामुळे होणारी दुरावस्था, विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांचे प्रश्न, केन्द्र सरकारने आणलेल्या नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्राची होऊ पाहणारी हानी यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणून चिंता वाटते.
त्यातच केन्द्र शासनाच्या धोरणामुळे लोकशाहीची होणारी कुचंबणा व सामाजिक ऐक्य आणी एकात्मता यांना होणारी बाधा…
या सर्व कारणांमुळे लोकशाहीच्या मजबुतीसाठी नेहरूजी ..इंदिराजी, राजिवजी यांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक ऐक्यास आणी लोकशाहीस मजबुत करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मजबूत करणे ही आजच्या वर्तमानाची व भविष्याची नितांत गरज आहे.
म्हणून याच सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रवाहा बाहेर राहुन काम सुरुच होते. परंतु आता मा. मुकुलजी वासनिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या प्रवाहात येऊन नव्याने काम करण्याचा निर्णय आज घेतला.
याप्रसंगी मा.मुकुलजी वासनिक साहेबांसह माझे मित्र व मार्गदर्शक मा. विजयजी अंभोरे (उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) , मा. राहुल भाऊ बोंद्रे (अध्यक्ष, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी) व पक्षातील इतर हितचिंतक मित्र हे प्रवेशावेळी उपस्थित होते……!! आपण सर्व नेहमीच माझे सुख दुःखात सोबत राहले अशेच प्रेम व आशिर्वादाची अपेक्षा हि विनंती…