शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी – जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचे तहसीलवर आंदोलन 

* शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी – जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत
बुलडाणा 
       शेतमालाल हमीभाव देण्यात यावा, रासायनिक खते, बी बियाणे, औषधी यांचे दर कमी करण्यात यावे, जाचक अटी कमी करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा आदी मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मोताळा तहसीलवर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
         तहसीलदार वैभव पिल्लारे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. गेल्या दोन वर्षापासून ठिबक सिंचनाचे अनुदानही रखडले आहे. महाडीबीटी वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत अद्यापही पूर्ण झालेली नाही.चक्रीवादळामुळे पडलेले पोल दुरुस्त करण्याची गरज आहे. ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे, मोदी आवास योजना पंतप्रधान आवास योजना सुरू करून घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
         यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवार म्हणाले, आसमानी व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अहवालदिलं आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अवकाळी तर कधी चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जसे की पीएम किसान ठिबक अनुदान, पीक विमा योजना रखडलेली आहे. या सर्वांना तात्काळ लाभ देण्यात यावा. यासाठी संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर , जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात तहसीलदार मोताळा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई बढे, उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे, तालुकाप्रमुख लाखन गाडेकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख शुभम भोंगटे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रकाश बोर्डे, किसान सेना तालुकाप्रमुख सुधाकर सुरडकर, गजानन कुकडे ,सागर गोकुळ, संदीप पाटील ,भगवान शिखरे, राजू बोरसे यांच्यासह मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधव व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *