कास्ट्राईब राज्यपरिवहन कर्मचारी संघटने कडून नव्याने रूजू झालेले बुलडाणा डेपो मॅनेजर अमोल गडलिंग यांचा सत्कार
बुलडाणा,(प्रतिनिधी )- बुलडाणा आगारात नव्यानेच डेपो मॅनेजर पदी रूजू झालेले उच्चविभूशित असलेले आगार व्यवस्थापक अमोल गडलींग हे आमरावती विभागात आमरावती, यवतमाळ, परतवाडा, बडनेरा या आगारात त्यांनी दहा वर्ष रापची सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगीरी केली त्यांच्या कामगीरीची राप प्रशासनाने दखल घेवून त्यांची बुलडाणा आगारात डेपो मॅनेजर पदी पदोन्नती दिली आहे व ते बुलडाणा आगारात नव्यानेच रूजू झाले आणि पदभार घेतला आहे.
बुलडाणा जिल्हा एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे मा.राज्यउपाध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली डेपो आध्यक्ष रवि अवसरमोल, वाहतूक निरिक्षक पद्दमाकर मगर, विभागीय सचिव भारत आराख, डेपो सचिव जितेंद्र साळवे, शाम कऱ्हाळे, चंद्रकांत मोरे, अनिल वाहुळे, कंट्रोलर जमील अहमद, संतोष काळे, खनसरे, धारपवार, सचिन खिर्डिकर, इरफान यांनी पुष्प गुच्छ शाल देवून सत्कार केला. बाबासाहेब जाधव यांनी कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेंच्या पदाधिकारी व सभासदांचा परिचय करून दिला. बाबासाहेब जाधव यांनी आमची संघटना १९८० मध्ये स्थापन झाल्यापासून एसटीच्या प्रगती साठी चांगल्या ध्येय धोरणासाठी नेहमी सहकार्य करत राहीली आहे व राहत आहे आपणासही रापच्या कामात आमच्या संघटनेकडून आपनास नेहमी सहकार्य राहील आपणांस पूढील वाटचालीसाठी संघटनेकडून शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना आगार व्यवस्थापक गडलींग म्हणाले की, मी जेव्हा या राप सेवेत रूजू झालो तेव्हा पासून मी प्रवासी माझे दैवत आहे प्रवाशांची सर्वप्रथम सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो व मी नेहमी आलेल्या प्रवाशांचा मानसन्मान करतो रापचे कर्मचारी यांचे मी पालकत्व घेतले आहे म्हणून मी तूमच्या सुख दुःखात नेहमी सहभागी राहील आणि ते माझे कर्तव्य आहे . एसटी ही लोकाभिमुख झाली पाहीजे हे मी माझ्या कर्मचाऱ्यांना नेहमी मार्गदर्शन करत राहतो प्रवासी सेवा हीच इश्वरसेवा म्हणून काम करा त्यांचे फळ आपल्या मुलाबाळाना मिळते प्रवासी सेवे बरोबर आपणासही सुखी जीवनाचा मार्ग मीळतो म्हणून सर्वप्रथम आई ही जन्मदाती आहे त्यानंतर जी अन्नदाती आपली दुसरी आई एसटी आहे व प्रवासी दाते आहे म्हणून त्यांची मनोभावे सेवा करा सेवा केल्याने मेवा भेटतो हे समजून चला या मुळे एसटीचीही प्रगती होईल व त्याच बरोबर आपली ही प्रगती होईल म्हणून प्रवाशी व एसटी बद्दल आपण सर्वांनी पॅाझीटीव्ह विचाराने वागले पाहीजे. तूम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईन व अधिकारी,कर्मचारी व प्रशासनाच्या माध्यमातून एसटीची प्रगती कसी होईल यांची शपथ घेऊ. तूम्ही केव्हाही माझ्याकडे या माझ्या कडून तूम्हाला जे सहकार्य लागेल ते मी वेळो वेळी देईल माझ्या कडून कोणावरी अन्याय होणार नाही मी ज्यावेळेस मी तुमचे पालकत्व स्विकारले आहे हे आपला कुटूंब म्हणून वागू. पण सर्वप्रथम एसटीचे काम नंतर दुसरे काम करा एसटीच्या कामाला प्रथम प्राधान्य द्या असे सत्काराला मन मोकळे पणाने उत्तर दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारत आराख तर आभार प्रदर्शन जितेंद्र साळवे यांनी मानले यावेळी एसटी कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी, सभासद हजर होते.