जिजामाता महाविद्यालय येथे राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा
बुलडाणा
स्थानिक जिजामाता महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांच्या अध्यक्षतेखाली २ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय रसायन शास्त्र दिवस भारत सरकार च्या आदेशानुसार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्वप्रथम आचार्य प्रफुल चंद्र राय रसायनशास्त्राचे जनक यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष कुंभारे यांनी भारतीय रसायन शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल चंद्र राय रसायन शास्त्र जनक यांच्या जीवनपटावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. तर प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी थोर शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल चंद्र राय यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचा आदर्श समोर ठेवून आपले ध्येय पूर्ण करायला हवे, रसायन शास्त्रामध्ये आचार्य राय आणि यांची चरित्रे रसायन शास्त्रातील संशोधन पत्रिका यांच्या अवलोकन करून विद्यार्थ्यांच्या विज्ञानामधील रुची वाढवण्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा, या सर्व शास्त्रज्ञांची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात केमि क्विझ स्पर्धा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रदीप वाघ तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. आनंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. उमेश वावगे, प्रा. श्रद्धा श्रीवास, प्रा. यास्मिन श्रीवास्तव, गुलाबराव भोंगे, विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.