राजर्षी शाहू मल्टीस्टेट ने सहकारातून जोपासला लोककल्याणाचा विचार- कडूभाऊ काळे* राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा शाखा स्थलांतरण सोहळा उत्साहात
राजर्षी शाहू मल्टीस्टेट ने सहकारातून जोपासला लोककल्याणाचा विचार- कडूभाऊ काळे
* राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा शाखा स्थलांतरण सोहळा उत्साहात
चिखली
सर्वसामान्य माणसाने काबाडकष्ट करुन गोळा केलेल्या जमापुंजीची राखणदारी करण्याचे काम सहकारी बँक, पतसंस्था करीत असतात. ठेवीदारांना योग्य परतफेड देण्यासह ठेवींची सुरक्षितता हा त्यांचा धर्म आहे. राजर्षी शाहू पतसंस्थेने सहकारातून लोककल्याणाचा विचार जोपासला, असे प्रतिपादन फेडरेशन ऑफ मल्टिस्टेटचे संचालक कडूभाऊ काळे यांनी केले.
राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या चिखली शाखेचा स्थलांतरण सोहळा १२ ऑगस्ट रोजी येथील जनाई व्यापारी संकुलमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चिखली अर्बनचे अध्यक्ष सतिष गुप्त होते. मंचावर अंबिका अर्बनचे अध्यक्ष ॲड. विजय कोठारी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, पंडितराव देशमुख, ॲड. मंगेश व्यवहारे, परमेश्वर सोळंकी, अनिल काळे, विलास भडाईत, विष्णू अंबास्कर, प्रज्ञाताई भालेकर, वंदनाताई सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सहकार पंढरीत कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. तसेच संस्थेची आजपर्यंतची वाटचाल आणि संस्थेचे उपक्रम याविषयी माहिती दिली. क्युआर कोडमुळे संस्थेचे कामकाज अधिक गतिमान झाले असून ग्राहकांना दर्जेदार सुविधा प्रदान करता येत असल्याचे त्यांनी सांगितले राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांनी संस्थेच्या यशाचा चढता आलेख पाहून समाधान व्यक्त करीत कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलतांना सतीश गुप्त यांनी आजच्या काळात सहकार क्षेत्रात काम करीत असतांना येणाऱ्या अडचणी आणि धोके सांगितले. ठेवीदारांनी आपला पैसा गुंतवतांना चार वेळेस विचार करावा असे आवाहन करीत सहकारी बँक, पतसंस्था विश्वासाचे ठिकाण असल्याचे सांगितले.
तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झाली. चिखलीसाठी ही भूषणावह बाब असल्याने कार्यक्रमात या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. निवृत्ती सावळे पाटबंधारे प्रकल्प अधिकारी पदी तर रेणुका घुबे तलाठीपदी निवड झाली असून संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक, स्थानिक सल्लागार आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचलन गणेश धुंदळे यांनी केले
* चिखलीकरांचे प्रेम विसरणार नाही :
आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ चिखलीत गेला असून आपल्या जडणघडणीत मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतकांचे मोठे योगदान आहे. आता सहकार क्षेत्रात काम करीत असतांना सर्वच घटकातील नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. मी बुलढाण्यात राहत असलो तरी चिखलीकरांचे माझ्यावर जास्त प्रेम असून त्यांचे प्रेम विसरु शकत नाही, असे भावनिक विचार राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केले.
* या मान्यवरांनी दिल्या भेटी :
राजर्षी शाहू मल्टीस्टेट चिखली शाखा स्थलांतरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. ज्योतीताई खेडेकर, डॉ. सत्येंद्र भुसारी, अशोक पडघान, दामूअण्णा येवले, प्रकाश दिघेकर, रूपालीताई चौधरी, अभय जैन, सुनील मोडेकर, महेश महाजन, शिवराज पाटील, डॉ. प्रतापसिंग राजपूत, देवेंद्र कपूर, नितीन पाटील, पप्पू राजपूत, श्रीराम झोरे, संतोष वाकडे, मुन्नाभाई पटेल, सतीश महाजन, नितीन शेळके, सुहास शेटे यांनी भेटी दिल्या.