*निराधार बेघर वृद्धाच्या सेवेतच खरे पुण्य*
भाई दिलीप खरात
चिखली -: निराधार बेघर घरातून काढून दिलेल्या वयोवृद्ध व निराधार महिला अनाथ बालके यांची ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेर घर लताई अनाथालंय भोकर येथे निःस्वार्थ व मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील निराधार आधार देणासाठी वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते संघर्षशील बहुजन योद्धा भाई दिलीप खरात हे मुलीच्या प्रतेक वाढदिवसाला दरवर्षी विविध ठिकाणी गरिबांना अन्नाथ आश्रमात जाऊन मदत करतात यांनी आपली मुलगी कु अंजलीताई च्या वाढदिवसाच्या निमित्त यावर्षी निराधार लोकांच्या सेवेकरिता किराणा भेट दिला. निराधार बेघर वृद्धाच्या सेवेतच खरे पुण्य आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेकरिता दानशूर लोकांनी समोर आले पाहिजे, समाजात खूप दानशूर आहेत त्यांना मी आवाहन करतो कि आपण हि आपला खारीचा वाटा या निराधार लोकांच्या सेवेत लावावा असे मत भाई दिलीप खरात यांनी व्यक्त केले. वृद्धाश्रमच्या वतीने संचालक प्रशांत डोंगरदिवे व संचालिका रुपाली डोंगरदिवे यांनी खरात परिवाराचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी आई आम्रपाली खरात अजय खरात संग्राम खरात अनुजा जाधव, भास्कर डोंगरदिवे, कावेरी भास्कर डोंगरदिवे यांच्या सह इतर नातेवाईक उपस्थित होते.