आरोप सिद्ध करून दाखवल्यास राजकारणातून संन्यास घेईल..* जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवार
पुढे होऊ घातलेल्या विविध सभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध पक्षांचे पक्षश्रेष्ठी येऊन चाचपणी करत आहेत त्यातच काल शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षनेते संजय राऊत हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख यांची तक्रार करून जालिंदर बुधवत यांचे अर्थपूर्ण संबंध खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी असल्याचे पत्रात म्हटले आहे.
यावर बुलढाणा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे आरोप खोडून काढत माझा खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी काडीमात्राचाही संबंध नाही
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्यातील तत्कालीन खासदार व आमदारांनी पक्ष सोडला परंतु मी पडत्या काळातही पक्ष बांधणीसाठी पायाला भिंगरी लावून जिल्हा पिंजून काढला व जिल्ह्याभरात एक ताकत आम्ही उभी करून लोकसभेत अवघ्या काही मतांनी आमचा पराभव झाला दुसऱ्या क्रमांकाची आम्ही मत घेतली
असे असताना पुढे येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुणीतरी निनावी पत्र देऊन पक्षाची बदनामी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि मी दुसऱ्या गटात त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून माझे अनेक काम थांबवण्यात आले तरीदेखील मी त्यांच्यासोबत न जाता पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करीत आहे.
कालच झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये संजय राऊत यांच्याकडे एकमुखाने पक्ष पदाधिकाऱ्यांनी जालिंदर बुधवत यांना बुलढाणा विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली असल्याची माहिती अकोला येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी ही माहिती दिली