कृषी सहाय्यक संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू
बुलढाणा जिल्हा कृषी सहाय्यक अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने अंतर्गत काम बंद आंदोलन सुरू आले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने कृषी सहाय्यकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासनाला निवेदनाद्वारे विनंती केली होती मात्र त्यावर कारवाई न झाल्याने आंदोलन सुरू केले आहे
राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आणि कृषी सहायकांनी पुरावे देऊनही शेतकरी आक्रमक झालेत ते अंगावर धावून येत असल्याच्या घटना घडल्या आहेत वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची नावे नसल्याने लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यास विरोध करण्यात आला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात एका गावात तील कृषी सहाय्यकाला घेरा घालण्यात आला यावर कळस म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद तालुक्यातील मुख्यालय सराई येथे कृषी सहायकाला यादीत नाव का टाकले नाही म्हणून शेतकऱ्यांनी मारहाण केली याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे
या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी यासाठी काम बंद आंदोलन केले असल्याची
विलास रेंढे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटन यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली