मृत्यूनंतर ही सहन कराव्या लागतायेत मरण यातना…
बुलढाणा :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आजही ग्रामीण भागांमध्ये मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेली गाव आहेत.
एकविसाव्या शतकात आपण पदार्पण केलं देश प्रगतीपथावर असल्याचं बोललं जात आहे देश विश्वगुरू होण्याच्या दिशेने काम करत असल्याचं सातत्याने बोलले जात आहे मात्र खऱ्या अर्थाने आजही श्रीमंत गरीब, छोटा मोठा, गाव शहर यात मोठी तफावत दिसून येत नुकताच 78 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील 1500 लोकसंख्या असलेलं घटनान्द्रा या गावाला साधी स्मशानभूमी सुद्धा नाही ही शोकांतिका आहे.
पुढाऱ्यांना राजकारण करायचे असते की गावाची आठवण येते व गावाच्या मूलभूत सुविधा देखील ते पोहोचू शकले नाही हे गाव चिखली मतदारसंघातील प्रसिद्ध सैलानी बाबा दर्गा या नावाने संपूर्ण राज्याला परिचित आहे.
असे असताना सातत्याने काँग्रेस पक्षाने येथे जवळपास 50 वर्षे आमदारकी भोगली असताना देखील देखील येथील मूलभूत गरजा काँग्रेस मूलभूत सुविधा पुरवण्यात अशक्षम ठरली आहे.
तसेच भाजपाच्या तीन वेळा रेखाताई खेडेकर या आमदार झाल्या आणि आता विद्यमान आमदार श्वेता महाले ह्या भाजपाच्या आमदार आहेत.या सत्तेत असून देखील त्यांचे या गावाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष असल्याच दिसतय त्यांचा कार्यकाळ संपत आला असून त्यांच्या कार्यकाळात देखील या गावाला अद्यापही मूलभूत ज्या सुविधा लागतात त्यापैकी स्मशानभूमी हे अद्यापही झालेले नाही यामुळे मेल्यानंतरही प्रेताला मरण यातना सोसाव्या लागत आहेत.
याच गावातील पंधरा दिवस अगोदर नामे विशाल दिलीप चव्हाण वय वर्ष 32 व
दिनांक 17 8 2024 रोजी संपत राऊत 85 वर्षे यांच्या प्रेतांना अक्षरशा घाटनांद्रा दुधा मार्गावरील रस्त्याच्या कडेला सरण रचून अग्नी दाह द्यावा लागला
विशेष म्हणजे या गावातील मुस्लिम बांधवांसाठी गावातील पांडुरंग गणपत सुरडकर यांनी त्यांच्या शेतातील अर्धा एकर वावर या मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानासाठी दान दिली त्यामुळे त्यांचा दफन विधीचा प्रश्न मार्गी लागला परंतु शासनाची अद्याप पर्यंत या गावाला स्मशानभूमी नसल्याने इतर समाजांच्या नागरिकांना अग्नीदाह देण्यासाठी जागा निश्चित नाही ज्यांच्याकडे शेत असेल तर काही लोक त्यांच्या शेतात तर नाईलाज असतो तेव्हा रस्त्यावर सुद्धा प्रेताला अग्नी दहा देण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली आहे.
अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पुढे येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे पुढारी गावागावात जाऊन सभा ब बैठका घेत आहेत यावेळी गावकऱ्यांनी हा प्रश्न मांडून स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून मृत्यूनंतरही प्रेताला मरण यातना सोसाव्या लागणार नाहीत
——————–
स्मशानभूमीसाठी शासनाकडून 7 ते 8 लाख रुपये मंजूर असून ई क्लास जमिनीवर झालेले अतिक्रमण काढल्याशिवाय स्मशानभूमीसाठी जमीन मिळणे अशक्य आहे.
काही हत्या अगोदर तहसीलदार बी डी ओ यांनी येऊन ई क्लास जमिनीची पाहणी केल त्या जमिनीवर अतिक्रमणधारकांनी पेरणी केली असल्याने हे पीक निघपर्यंत आपण थांबावं व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावावी त्यानंतर हे अतिक्रमण काढल्यानंतरच या जागी सर्व समाजासाठी सार्वजनिक स्मशानभूमी तयार होईल परंतु शासनाने तात्काळ स्मशानभूमीसाठी ही अतिक्रमित जमीन खाली करून द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधता येईल
*भुसारी सरपंच घाटनांद्रा*