बुलडाणा शहराला आता दररोज होणार पाणी पुरवठा – आमदार संजय गायकवाड  *  येळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन

बुलडाणा शहराला आता दररोज होणार पाणी पुरवठा – आमदार संजय गायकवाड * येळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन

बुलडाणा शहराला आता दररोज होणार पाणी पुरवठा – आमदार संजय गायकवाड 

*  येळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन

बुलडाणा
       शहरातील नागरिकांना आता दिपावली पर्यत दररोज पाणी पुरवठा केला जाईल, पाण्याचे योग्य नियोजन लवकरच केले जाईल. कोणालाही पाणी टंचाईच्या झळा बसणार नाही, अशी ग्वाही आमदार संजय गायकवाड यांनी दिली. येळगाव धरण येथे जलपूजन विधीनंतर बोलत होते.
बुलडाणा धरण यंदा ओवर प्लो झाल्याने बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी येळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन केले. ही पूजा रविवारी दुपारी पार पडली. 
      मागील अनेक वर्षापासून बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणाची पाणी पातळी झपाटयाने कमी होत चालली होती. शुक्रवार पर्यंत ७५ टक्के भरलेले येळगाव धरण हे शंभर टक्के भरेल की, नाही याची शाश्वती नव्हती. काही दिवसापासून सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे धरण ओवर प्लो हाेवून वाहत आहे. धरणात मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरु झाल्याने हे धरण तुडुंब भरून वाहत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहरासह परिसरातील अनेक गावांना या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. बुलडाण्यात मागील मे महिन्यापर्यंत पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या धरणात केवळ २० टक्केच जलसाठा शिल्लक होता. पाणी उपसामुळे वेगाने जलसाठ्यात घट ही होत होते. त्यातच कालपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदारपणे हजेरी न लावल्याने बुलडानेकरांची चिंता चांगलेच वाढली होती. 
 
      पैनगंगा वाहून जात असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता कायमची मिटली आहे. नुकतेच आमदार संजय गायकवाड यांच्या नियोजनातून शहराला नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. सदर काम हे शहरवासियांना 24 तास पानी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने  करण्यात आले होते. आता धरणात मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने दिपावली पर्यत नागरिकांना दररोज पाणी पुरवठा उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन आमदार गायकवाड यांनी दिले आहे.
      यावेळी माजी नगराध्यक्षा पुजा गायकवाड, पालिकेचे प्रशासक गणेश पांडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ओमसिंग राजपूत, नगरसेवक मंडळी आदी मोठया प्रमाणात यावेळी उपस्थित होती.
 
* डोंगर खंडाळा येथे दुप्पट धरण उभे राहणार 
       बुलडाणा तालुक्यातील डाेंगराखंडाळा या भागात नवीन धरण उभारण्याचे काम लवकरच सुुरु केले जाणार आहे. त्या धरणाची क्षमता येळगाव पेक्षा ही दुप्पट असणार असून बुलडाणा शहरातील नागरिकांना न भुतो न भविष्य असे धरण उपलब्ध होणार असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या ही कामय स्वरुप संपणार असल्याची माहिती आमदार गायकवाड यांनी दिली.
 
* आमदार गायकवाड यांनी मानले ईश्वराचे आभार
        शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  येळगाव धरणात गाळ उपसा करण्यात आला होता, त्यामुळे या धरणाची क्षमता आता पुर्वी पेक्षाही अधिक झाली आहे. यंदा तर श्रावणाच्या शुध्द पाण्याने हे धरण भरले आहे, त्यामुळे मी विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्यावतीने ईश्वराचे आभार मानतो, असे भावनिक उदगार ही त्यांनी काढले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *