रक्ताच्या नात्यापेक्षाही राखीचे नाते श्रेष्ठ – प्रा.लहाने

रक्ताच्या नात्यापेक्षाही राखीचे नाते श्रेष्ठ – प्रा.लहाने

मोताळ्यात एकल महिलांचे रक्षाबंधन: हजारो महिलांसह पुरुषांनी घेतली अनोखी शपथ…

बुलडाणा

राणी कर्मवती ने सम्राट हुमायूँ ला राखी पाठवून तिच्या राज्याच्या रक्षणाची मागणी केली होती.त्या राखीच्या धाग्याचा आदर ठेवून हुमायून या मुस्लिम राजाने राणी कर्मवतीस बहीण मानून तिच्या राज्याचे रक्षण केले हा इतिहास आहे. एक राखीचा धागा हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. रक्ताची नाती ही आपोआप तयार होतात, परंतु राखी चे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असते. असे प्रतिपादन प्रा. डी एस लहाने यांनी केले. मोताळा येथे एकल महिला, विधवांचे अनोखे रक्षाबंधन 23 ऑगस्ट रोजी पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रक्षाबंधनात हजारो महिलांनी लावलेली उपस्थिती आणि घेतलेली अनोखी शपथ हा चर्चेचा विषय ठरला आहे.

येथील समर्थ मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवशाही परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव चिंचोले होते. तर माधुरीताई देशमुख नगराध्यक्ष मोताळा, श्रुती दीदी ,रवी पाटील ,गायकवाड ताई, रामेश्वर पाटील ,सुनील काटे ,डॉक्टर शरद काळे, मोबीन अहमद, गायकवाड साहेब ,उमेश कोळसे ,प्रमोद कळसकर,तुळशीराम मापारी, तुळशीराम पाटील, प्रकाश नाईक ,बळीराम जाधव ,शुभम चौधरी ,शिराळ सर, भागवत भाऊ ,सतीश नरवाडे ,शहनाताई पठाण,गणेश निकम, संदीप वानखेडे,अनिता कापरे ,प्रज्ञा लांजेवार, जिजा चांदेकर ,मनीषा वारे ,किरण पाटील, दीपक पाटील, पंजाबराव गवळी, संदीप जाधव, गजानन मुळे ,गौरव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.तर मानस फाउंडेशन च्या वतीने उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना प्राध्यापक डी एस लहाने म्हणाले, द्रोपदीच्या पाठीशी श्रीकृष्ण भाऊ म्हणून उभा राहिला. बहिण जेव्हा संकटात असते तेव्हा भाऊ तिच्या पाठीशी उभा राहतो. हे नातं स्पष्ट करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन आहे. आज विधवा महिलांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांच्या पाठीशी समाजातील सहृदय भावानी उभे राहण्याची गरज आहे.महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन प्राध्यापक डीएस लहाने यांनी करून मानस फाउंडेशनच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. मोताळा येथे आयोजित केलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात लागलेली हजारोंची उपस्थिती पाहून हा रक्षाबंधन सोहळा परिवर्तनाची नांदी ठरला आहे. असे प्राध्यापक लहाने म्हणाले.
यावेळी मोताळा नगराध्यक्ष देशमुख यांनीही विचार व्यक्त केले.कवी तुळशीराम मापारी यांनी विधवांच्या प्रश्नावर भाष्य केले. तर डॉक्टर शरद काळे यांनीही प्रासंगिक विचार मांडले. कार्यक्रमाचे संचलन मानस फाउंडेशनच्या मनीषा वारे यांनी तर आभार अनिता कापरे यांनी मांणले.

*प्रज्ञा लांजेवार यांनी दिली शपथ*

रक्षाबंधन कार्यक्रम पार पडल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विधवा महिला आणि पुरुषांना शपथ देण्यात आली. दिवंगत साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांच्या पत्नी प्रज्ञा लांजेवार यांनी ही शपथ दिली. मी आयुष्यभर विधवा व एकूणच स्त्री वर्गाचा सन्मान करेल ,त्यांना मानसन्मानाची वागणूक देईल व शुभ कार्यामध्ये विधवांना सहभागी करून घेण्यास पुढाकार घेईल अशी शपथ यावेळी पुरुषांनी घेतली. तर विधवा प्रथा न पाळण्याची शपथ उपस्थित महिलांनी घेतली. हजारो महिला उभ्या राहून शपथ घेत होत्या तेव्हा समाज बदलाचं अनोखे चित्र मोताळात उभे राहिले होते.

*पाच हजार साड्यांचे वाटप*

विधवा महिलांचा हक्काचा भाऊ म्हणून प्राध्यापक लहाने पुढे आले आहे.रक्षाबंधनासाठी आलेल्या महिलांनी प्रा. लहाने व उपस्थित पुरुषांना राखी बांधली. यावेळी मानस फाउंडेशनच्या वतीने सदर महिलांचा साडी चोळी तसेच मिष्टान्न भोजन देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पाच हजार महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले. मोताळा तालुक्यातील बहुतांश गावातील विधवा महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *