ठिबक व तुषार सिंचन संचाचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन….
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन चा वापर करून पाणी खत वीज मजूर बचत करून शेतमालाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळावे यासाठी शासनाने ठिबक व तुषार सिंचन संच विकत घेण्यासाठी अनुदान देत असते परंतु मागील 2023-24 मधील शेतकऱ्यांचे ठिबक व तुषार सिंचन संचाचे जवळपास 72 कोटी अनुदान रखडल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
2023- 24 चे अनुदान तात्काळ मिळावे व 2024-25 चे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निवड करून पूर्वसंमती देऊन अनुदानासाठी पुढील कारवाई करावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पुढील पंधरा दिवसात अनुदान न मिळाल्यास जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
दिलेल्या निवेदनावर राजू गायकवाड,गणेश गारवे,