जिल्ह्यात भिम आर्मीची ताकद वाढणार- सतिशदादा पवार
तळणी व पुन्हई या गावात भीम आर्मीच्या शाखेचे उद्घाटन
मोताळा- भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तथा नगिना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यात भिम आर्मीची ताकद वाढणार असल्याचे प्रतिपादन भिम आर्मीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीशदादा पवार यांनी ग्राम तळणी येथे शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले. तालुक्यात भीम आर्मीचा झंझावातात जोरदार सुरु आहे. तळणी व पुन्हई येथे भीम आर्मीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सतीश दादा पवार यांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. गावातील मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जलघोष साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन खरात जिल्हा महासचिव विजय दोडे जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत, अनिल शिखारे तालुकाध्यक्ष सतीश गुरचवडे, तालुका उपाध्यक्ष सत्यपाल तायडे, धर्मराज मेढे, सुरज जाधव, रोशन शिकारे, तालुका महासचिव रवींद्र प्रधान, इकबाल खान, राजेश इंगळे, जितेंद्र तायडे, सिद्धार्थ शिंदे, रवींद्र गरुडे, शुभम धुरंधर, फिरोज खान, लाला गवई यांच्या सह तालुक्यातील सर्व तुला मोलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी तळणी व पुन्हई येथील गावातील सर्व गावकरी व महिला मंडळी उपस्थित होते व येणाऱ्या काळात भीम आर्मीचे हात मजबूत करू अशी ग्वाही त्यांनी दिली.