नागसेन अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
चिखली:- नागसेन सांस्कृतिक व क्रीडा समिती चिखली द्वारा सर्व सुविधांनी परीपूर्ण अशी “नागसेन स्पर्धा परीक्षा अभ्यासिका” चालविली जाते. येथे बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस भरती मध्ये बरेच विद्यार्थी यशस्वी होऊन त्यांची पोलीस दलात निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे नागसेन सांस्कृतिक व क्रीडा समिती चिखली च्या संचालकांनी ठरविले. त्यानुसार श्रावण पौर्णिमेचे औचित्य साधून नागसेन बुद्धविहाराच्या धम्म हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील तायडे आणि प्रा. डॉ. सुभाष राऊत यांची उपस्थिती लाभली. स्वप्नील तायडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अभ्यास करताना विद्यार्थ्यानी वेळेचे नियोजन कसे करावे हे स्वत:च्या अनुभवातून उदाहरण देऊन सांगितले. प्रा. डॉ. सुभाष राऊत यांनी आपण एखाद्या पदावर निवडले गेलो तर आपण ‘PAY BACK TO SOCIETY’ या संकल्पनेतून समाजासाठी आणि समाजातील आपल्या लहान बहीण भावांसाठी काही करता येईल का हे बघितल पाहिजे आणि समाजासाठी एक आदर्श निर्माण केला पाहिजे असे विद्यार्थ्याना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव मोरे होते. बी. बी. साळवे, एस. एस. मघाडे, टि. एस. खरात, एस. पी. विणकर, संगीताताई लहाणे हे संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व्ही. के. डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. एस जाधव यांनी केले. नंतर आशीष जाधव (पोलीस) यांचेकडून भंते दिपंकर चिवर दान देऊन व उपस्थितांना खीर वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमासाठी डॉ. गजानन जाधव, अरविन्द गजभिये, प्रेमानंद गवई, रवींद्र उमाळे, लक्ष्मण पाईकराव, गवई बाबा, जाधव बाबा, आर.जी. जाधव, देवराव आराख, तायडे सर, बबन चव्हाण, पवार साहेब, मिलिंदकुमार मघाडे, विरसेन साळवे, पंकज जाधव, सागर गवई, विकास मघाडे, हर्षवर्धन साळवे, स्वप्नील जाधव, विशाल लहाणे यांनी श्रमदान केले. उज्वला गजभिये, मधुमिता गवई, संगीता लहाणे, सुरेखा उमाळे, मधुबाला राऊत, सिंधु जाधव, रंजना बोर्डे, नलिनी जाधव, अनुराधा जाधव, नंदा जाधव, रत्नमाला डोंगरदिवे, दुर्गा चव्हाण, सुमन साळवे, सरिता खरात, मथुरा खरात, सविता तायडे, अरुणा निकाळजे यांचेसह परिसरातील महिला व युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.