*पुस्तक प्रकाशन ,गुणवंतांचा सत्कार: वर्धापन दिन कार्यक्रम ठरला लक्षवेधी..*
*मराठा सेवा संघ हे ‘जाज्वल्य’ विचारांचे विद्यापीठच – डॉ.बालाजी जाधव*
*बुलढाणा*
*गेल्या 34 वर्षापासून मराठा सेवा संघ हा ताठ मानेने चालतोय कारण युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सारखे नेतृत् कणखर आहे. मराठा सेवा संघाने जिजाऊंचा विचार दिला. आम्ही काहीही लिहू आणि लोक गुमान वाचतील अशा लोकांना आज काहीबाही लिहिताना मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड दिसते. हेच मराठा सेवा संघाचे मोठे यश आहे. लोक जेव्हा राहुल गांधींना ब्रिगेडी म्हणतात त्यातच ब्रिगेडच मोठे यश सामावलेले आहे. ज्या क्षेत्रामध्ये मराठा कधीच नव्हता अशा क्षेत्रातही मराठा समाज आता उतरला आहे. लिहिणे, वकृत्व, बोलणे, वाचन यामध्ये समाजाला रुची लावण्याचे काम मराठा सेवा संघाने केले आहे. मराठा सेवा संघ केवळ एक संघटन नाही तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांसाठी विचाराची शिदोरी असून ते विचारांचे जाज्वल्य विद्यापीठ आहे. असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते डॉ. बालाजी जाधव यांनी बुलडाणा येथे केले.*
*येथील शरद कला महाविद्यालय येथे मराठा सेवा संघाचा 34 वा वर्धापन दिन व कुटुंब स्नेहमिलन सोहळा 1 सप्टेंबर रोजी दुपारी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिक्षणाधिकारी अनिल अकाळ होते.तर उद्घाटक म्हणून बुलढाणा विधानसभा क्षेत्राचे आ.संजय गायकवाड, प्राचार्य विष्णुपंत पाटील ,जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी, वनिताताई अरबट, ज्योती ताई जाधव , ceo गणेश पांडे यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर व रेखाताई खेडेकर यांनी सामान्यपने दर्शकांमध्ये बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.*
*मराठा सेवा संघाच्या स्थापनेला 34 वर्षे पूर्ण होत आहे.त्या निमित्ताने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघ ‘आज काल आणि उद्या’ या विषयावर डॉ.बालाजी जाधव यांनी व्याख्यान दिले. पुढे बोलताना डॉ. बालाजी जाधव म्हणाले- इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर ‘जिजाबाई’शिवाजीच्या आई होत्या.. एवढा त्रोटक उल्लेख जिजाऊंचा यायचा. ज्या जिजाऊने स्वराज्याची प्रेरणा दिली, इतिहास घडवला त्या जिजाऊंचा नमोउल्लेखही नव्हता. मराठा सेवा संघाने सत्य इतिहासाचा धांडोळा घेत जिजाऊंचे चित्र उभे केले.ते चित्र विधानसभेत देखील लावले. जय जिजाऊ चा नारा दिला. ‘जय जिजाऊ’ हा नारा माणसे जोडण्याच प्रतीक आहे. मोडेल पण वाकणार नाही… तो मराठा असे म्हटले जायचे पण हे खरे नाही. संत तुकोबांनी महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती!असा संदेश दिलाय. हा संदेश मराठा सेवा संघने तरुणांना दिला आहे. वेळप्रसंगी लवचिक व्हा ,डोक्याच्या मालिश पासून बुट पॉलिश पर्यंत कुठलेही काम करा, असे व्यवसायिक सूत्र देण्याबरोबरच अधिकारी वर्गाला एक जाणीवही करून दिली. आपण समाजाचे देणे लागतो, उच्च शिक्षित अधिकारी वर्गाने आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले पाहिजे, याचे भान अधिकारी वर्गाला देण्याचे काम मराठा सेवा संघ करीत आला आहे. मराठा ही संज्ञा मुळातच कुणबी पासून आली. कुणबी हाच मराठा असून तो ओबीसी आहे असे बालाजी जाधव म्हणाले.वाघाला संघटनेची गरज नसते असे म्हणतात. परंतु असे म्हणता म्हणता वाघांच अस्तित्वच संपत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.त्यामुळे कोणी कितीही मोठा असो त्याला संघटने शिवाय पर्याय नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असे बालाजी जाधव म्हणाले. आम्ही सर्व काही सहन करू परंतु अस्मितैशी खेळाल तर याद राखा.. गाठ मराठा सेवा संघासी आहे.भांडारकर प्रकरणी ते दिसले आहेच असा इशारा त्यांनी दिला. वक्त्यांचा परिचय इतिहास अभ्यासक प्रमोद टाले यांनी करून दिला व कार्यक्रमाची भूमिका मांडली. प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी प्रासंगिक विचार व्यक्त* *केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल आकाळ यांनी मराठा सेवा संघाची आगामी वाटचाल विशद करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.संचलन राजेंद्र धोंडगे यांनी तर आभार प्रा. सुबोध चिंचोले यांनी मानले.कार्यक्रमासाठी विविध कक्षांच्या पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.निवृत्त अभियंता रवींद्र काळवाघे, कोल्हे सर,सवडतकर सर, सचीन तायडे ,निवृत्त अभियंता गुलाबराव कडाळे, इतिहास अभ्यासक संजय खांडवे, संजय विखे ,अभय पाटील, पत्रकार गणेश निकम , योगेश पाटिल, मिसाळ सर ,गजानन पडोळ आदी उपस्थित होते.*
*पुस्तक प्रकाशन ,नियुक्त्या व गुणवंतांचा सत्कार*
*यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. मेहकर तालुका अध्यक्ष म्हणून प्रा.बाहेकर यांना जिल्हाध्यक्ष अकाळ व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. प्राध्यापक ज्याडे, शिक्षक दिवे , शिवमती पुष्पाताई गायकवाड बुलढाणा तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा ,उमेश तायडे बुलढाणा तालुका उपाध्यक्ष यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले.तर समाजसेविका इंदुमती लहाने यांनी ताराबाई शिंदे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले*.
*बॉक्स*
*सामाजिक कार्यासाठी केव्हाही तत्पर – आ. गायकवाड*
*मराठा सेवा संघाचे कार्य समाजाला दिशा देण्याचे कार्य आहे. त्यामुळे या सामाजिक कार्यात राजकारणा पलीकडे जावून केव्हाही हाक द्या मी तत्पर राहील असे आ. संजय गायकवाड उद्घाटनपर भाषणात म्हणाले.पुढे आ.गायकवाड म्हणाले – मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी,वसतिगृहासाठी आपण यापूर्वी भूखंड दिला आहे.तर या ठिकाणी एखाद सुसज्ज कार्यालय असावे यासाठी आपण 3 कोटी रुपये निधी सुद्धा देणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष अकाळ,डॉ.मनोहर तुपकर व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.*
*बॉक्स*
*आर्थिक क्रांतीकडे वाटचाल करूया-*
*डॉ.अशोकराव खरात*
*आर्थिक क्रांती हा सामाजिक उन्नतीचा पाया आहे असे प्रतिपादन करून जिल्हा बँकेचे सीईओ* *अशोकराव खरात यांनी समाजासाठी एखादी पतसंस्था असावी असा विचार मांडला. त्याला उपस्थित सर्वच मान्यवरांनी दुजोरा दिला आहे*.
*समाजाचा पैसा, समाजाच्या भल्यासाठी वापरण्यात येणार असल्याने हे आर्थिक क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला असे ते म्हणाले. कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीत लवकरच संस्था उभी करण्याचा संकल्प यावेळी मान्यवरांनी केला.*