शेगाव येथे बिल्डिंग पेंटर बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्याकरिता व कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळणे करिता होत असलेल्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली,असून पुढील काही दिवसात आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. व माजी जिल्हा अध्यक्ष नितिन भाऊं वाकोडे यांना राष्ट्रीय बॉडीत घेण्यात यावे व या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ मेश्राम, विनोद जबसरे महासचिव, उपाध्यक्ष बशीर भाई, कोषाध्यक्ष आत्माराम साठे, सहसचिव मनोज बाविस्कर माजी जिल्हाध्यक्ष माननीय नितीन भाऊ वाकोडे उपस्थित होते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली नवीन जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्ष ची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणी मध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून रघुनाथजी पाटील यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्ष ईश्वर भाऊ चराटे व ज्ञानेश्वर भाऊ कानेरकर सचिव गणेश भाऊ मोरे कोषाध्यक्ष,प्रकाश भाऊ मोरे संघटक,शे राजीक भाई प्रसिद्धी प्रमुख,प्रल्हाद भाऊ गव्हाळे सहसचिव,सुभाष भाऊ इंगळे सल्लागार,कालुभाई शाकीर खान संघटक,मंजूर भाई खान यांची निवड करण्यात आली असून तीन तालुका मेंधी अध्यक्षांची सुद्धा निवड करण्यात आली.जळगाव जामोद तालुका अध्यक्ष म्हणून कैलास ज्योतीराम भगत ,संग्रामपुर तालुका अध्यक्ष म्हणून अनिस भाई, व शेगाव तालुका अध्यक्ष म्हणून गणेश भाऊ बरब्दे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच
या कार्यक्रमाला ग्राम शाखा अध्यक्ष सोनगाव येथील अनंता भाऊ कतोरे ज्ञानदेव मामा मनस्कार शेक अनिस शागीर खान शेक राजीव प्रविण हवालदार रितेश सरकटे सिध्दार्थ मोरे शेक उस्मान गोविंदा सोळंके बब्बू ठेकेदार व त्यांचे सहकारी मित्र असे अनेक सभासद सदस्य उपस्थित होते.