भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार दि. १२ सप्टेंबर ते शनिवार दि. १४ सप्टेंबर पर्यंत तीन दिवस अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहतील.
* १२ सप्टेंबरला अकोला जिल्हा दौरा
गुरुवार दि. १२ रोजी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे अकोला जिल्हा दौऱ्याची सुरवात मूर्तीजापूर येथून करतील. सकाळी १० वा. येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी २.०० वा. आकोट येथील सत्यम पॅलेस हॉटेल येथे आकोट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायं. ५ वा. अकोला येथील जलसा रिसॉर्ट रिधोरा बाळापूर रोड येथील अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायं. ७.०० वा. पारस येथील न्यू क्लब बिल्डिंग औष्णिक वीज केंद्र, पारस येथे बाळापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
* १३ सप्टेंबरला वाशीम जिल्हा दौरा
शुक्रवार दि. १३ सप्टेंबरला वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील जी.बी. लॉन येथे रिसोड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी २.०० वा. वाशीम शहरातील परशुराम भवन, जुनी नगर पालिका रोड, आंबेडकर मार्ग येथे वाशीम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायं. ५.०० वा. मानोरा येथील ठाकरे पॅलेस, लालमाती, मंगरूळपीर रोड येथे कारंजालाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
* १४ सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा दौरा
शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे चिखली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी २.०० वा. मलकापूर येथील भाजपा कार्यालय गणपती नगर येथे मलकापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ५.०० वा. खामगाव येथील तुळजाई हॉटेल, पंचायत समिती समोर येथे खामगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.