*ना. जाधव, आ. गायकवाडांसह महायुतीच्या नेत्यांच्या पाठपुराव्याला यश*..
*पीकविम्याचे ११३.६४ कोटी मंजूर*
बुलढाणा :
जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांची थकीत असलेली पीक विम्याची रक्कम तांत्रिक त्रृट्यामुळे रखडली
होती. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी आ. संजय
गायकवाड, ना. प्रतापराव जाधव यांच्यासह महायुतीच्या आमदारांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात मॅरेथॉन बैठक घेतली होती.
त्या बैठकीला यश आले असून आज २६ सप्टेंबर रोजी पीक विम्यापोटी
११३.६४ कोटी मंजूर करण्यात आले असून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.
या संदर्भात आज भारतीय कृषी विमा कंपनीच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांना माहिती देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रधानमंत्री विमा योजना खरीप २०२३ हगामात बुलढाणा जिल्ह्यात
राबविण्यात आली. संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक योजनेच्या
तरतुदीनुसार अधिसूचित स्थानिक आपत्तीमध्ये हंगामातील प्रतिकूल
परिस्थिति, काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी आधारीत नुकसान भरपाई या अंतर्गत रक्कम १३८.५१ कोटी रुपये ही पात्र २,२४,४८२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतंर्गत रक्कम १२.९३ कोटी रुपये ही पात्र ९२८२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. पुनर्विलोकन करुन उर्वरीत एकूण १,२६,२६९ शेतकऱ्यांना पात्र नुकसान भरपाई रक्कम २३२.४८ कोटी मंजूर झाली असून त्यापैकी ४७, ७०७ शेतकऱ्यांना ११२.२९ पोर्टलवर २२ सप्टेंबर रोजी मंजूर कोटी नुकसान भरपाई एवसीआईपी करण्यात आली असून ती दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून उर्वरीत नुकसान भरपाई रक्कम राज्य शासनाच्या नुकसान भरपाईमधील हिस्सा रक्कम १२०.१९ कोटी प्राप्त होत
खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. विमा कंपनी मार्फत २०२३ व रब्बी २०२३ २४ हंगामातील क्लस्टर ७ मधील ११० टक्के पर्यंत
पात्र नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्यात आली असून उर्वरित रक्कम नुकसान भरपाई मधील राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम प्राप्त होताच ती शेतकऱ्यांच्या बँक
खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.