ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेचे 281 कोटी मंजूर

ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेचे 281 कोटी मंजूर

* खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला मिळाले यश 
बुलडाणा 
        राज्यभरात ठिबक व तुषार सिंचन योजना च्या लाभार्थ्यांचा निधी रखडला होता. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव व बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी सातत्याने सदर विषयाचा पाठपुरावा करीत शासन दरबारी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने आता ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी तब्बल 2 कोटी 81 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
 
        राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय कृषी योजना अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजना राबविली जात आहे. सदर योजनेच्या लाभार्थांचे अनुदान मागील काही काळापासून रखडलेला आहे. 
 या संदर्भात बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव, व बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी सदर निधी उपलब्ध व्हावा, याकरिता सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. या संदर्भात त्यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. झालेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने शासनाने आपला 120 कोटीचा हिस्सा उपलब्ध करुन दिला आहे, तर या योजनेतील राज्य शासनाच्या वतीने 40 टक्के म्हणजे 80 कोटी 32 लाख 66 हजार 667 रुपये वितरित करण्याच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिला आहे.
       सदर निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हा निधी लवकरच महाडीबीटी प्रणालीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *