शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूलचे दोन खो खो खेळाडू राज्याच्या संघात
34वी सब जुने राष्ट्रीय खोखो स्पर्धेचे आयोजन झारखंड या ठिकाणी दिनांक 28/ 9/2024 ते 2/10/2024 या कालावधीमध्ये करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी विदर्भ राज्याचा संघ देखील सहभागी होत आहे. या अनुषंगाने विदर्भ खो-खो असोसिएशन द्वारे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन लाहोटी महाविद्यालयाच्या मैदानावर अमरावती या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्याचा खोखो संगदेखील सहभागी झाला होता. या स्पर्धेत बुलढाणा जिल्हा जिल्ह्याच्या संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करून विदर्भातील नामवंत संघाचा पराभव केला. बुलढाणा जिल्ह्याच्या संघात अनुभवी खेळाडू गौरव गोरे व श्रीकांत येथे यांचा देखील समावेश होता. या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून राज्याच्या संघात आपले स्थान निश्चित केले आहे. हे दोन्ही खेळाडू शिवसाई युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत असून हे दोन्ही खेळाडू रोज सातत्याने खो खो खेळाचा सराव करतात. या निवडीबद्दल शिवसाई शिक्षण संस्थेचे संचालक डी.एस लहाने सर्व प्राचार्य- प्रमोद मोहरकर सर यांनी खेळाडूंची अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. बुलढाणा जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त टी ए सोर् सर जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर सर यांनी देखील खेळाडूचे अभिनंदन केले. खेळाडूंनी आपल्या यशाची श्रेय आपले आई वडील प्रशिक्षक उबाळे सर व मैदानावरील सर्व खो खो खेळाडू यांना दिले आहे…