*वारकरी, डेस्टीस्ट , आयुर्वेदीक भवन व विविध विकासकामासाठी 15 कोटीचा निधी मंजूर*

*वारकरी, डेस्टीस्ट , आयुर्वेदीक भवन व विविध विकासकामासाठी 15 कोटीचा निधी मंजूर*

*आमदार संजय गायकवाड यांनी खेचून आणला पुन्हा विकास निधी*

बुलढाणा

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी शेवटच्या टप्प्यात ही आपला विकासाचा धडाका सुरूच ठेवला आहे आता त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बुलढाणा नगरपरिषद व मोताळा नगरपंचायत ला तब्बल 15  कोटी रुपयाचा विकास निधी मंजूर करून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून वारकरी, डेन्स्टीस्ट,आयुर्वेदीक भवन तसेच    विविध  विकासाची कामे केली जाणार आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजना साठी विकास निधीची मागणी केली होती यामध्ये बुलढाणा नगर परिषद क्षेत्रात मागील अनेक दिवसापासून  वारकरी भवन बांधकाम मागील अनेक दिवसापासून सुरू आहे  सदर इमारतीच्या विस्तारीकरण व फर्निचर करिता 50 लाख रुपये तसेच, डेन्स्टीस्ट, आयुर्वेदीक व होमियोपॅथीक भवन साठी 65 लाख रुपयाचा निधी खेचून आणला आहे.  यासह हुतात्मा स्मारक विकास करण्यासाठी 50 लाख,  धर्मवीर आखाडा ते सुवर्ण गणेश मंदिर रस्ता विकसित करण्यासाठी 70 लाख, अध्यापक विद्यालय ते जिजामाता विद्यालय यांच्यामधील डीपी रोड विकसित करण्यासाठी 50 लाख,  प्रभाग क्रमांक दोन,  तीन,  चार मधील विविध कामासाठी तीन कोटी,  छत्रपती शिवाजी महाराज सभागृहांमधील न्युरल चे काम करीत आहेत 30 लाख,  नंदू राजपूत यांच्या घरासमोरील खुला भूखंड विकसित करण्यासाठी 12 लाख,  कराळे ले आउट मधील महादेव मंदिराचा  भूखंड विकसित करण्यासाठी 13 लाख,  गणेश नगर ते चंद्रमणी नगर,  राजमाता चौक ते क्रीडा संकुल रस्ता विकसित करण्यासाठी 50 लाख,  प्रभाग क्रमांक 9 मधील हनुमान मंदिर परिसरातील सभामंडप विकसित करण्यासाठी एक कोटी,  प्रभाग क्रमांक 14 मधील राम मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी 50 लाख,  छत्रपती सेवा संघ भवन बांधकामासाठी 50 लाख,  बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची उर्वरित कामे करिता 2 कोटी,  पोळा चौक येथे कमान विकसित करण्यासाठी 10 लाख,  शहरातील खुले भूखंड विकसित करण्यासाठी तसेच रस्ते नाले व पूल विकसित करण्यासाठी दीड कोटी,  कारंजा चौक येथील व्यास गार्डन मध्ये सभागृह बांधकामासाठी 50 लाख,  रिलायन्स पेट्रोलपंप ते आयटीआय कॉलेज रस्ता विकसित करण्यासाठी 1 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  यासोबतच मोताळा नगरपंचायत येथे मोताळा नगरपंचायत जुना मलकापूर रोड विकसित करण्यासाठी 50 लाख असे एकूण 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *