पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ कार्यान्वित करावे  ” व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांची महामहीम राज्यपालांकडे मागणी

पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ कार्यान्वित करावे 

” व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांची महामहीम राज्यपालांकडे मागणी
बुलडाणा
        लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून काम करत असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक समस्या आहेत. खासकरून यात आर्थिक समस्या वार्धक्यमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतात. त्यामुळे पत्रकारांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे आणि त्यात वार्षिक २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अशी आग्रही मागणी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी 4 ऑक्टोंबर रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे भेट घेऊन केली आहे.
 
       महामहिम राज्यपाल  बुलडाणा दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी समाजातील विविध घटकांची मते जाणून घेतली. यावेळी बुलडाण्यातील निवडक पत्रकारांशी देखील महामहिम राज्यपाल यांनी संवाद साधला. याप्रसंगी अनिल म्हस्के यांनी निवेदन देऊन पत्रकारांच्या व्यथा मांडल्या. यात व्हाईस ऑफ मीडियाची २० संपादकांनी एकत्र येऊन स्थापना केल्याचे सांगून आज ४३ देशांमध्ये संघटनेचे काम सुरू आहे. ३ लाख ७० हजारावर सदस्य संघटनेसोबत जोडले गेलेले असून महाराष्ट्रात ही संख्या सुमारे साडेसहा हजार इतकी आहे.
       पत्रकारांचे घर ,आरोग्य ,मुलांचे शिक्षण, नवीन कौशल्य आणि सेवानिवृत्तीनंतर पुढे काय या “पंचसूत्री” वर व्हाईस ऑफ मीडिया काम करत असल्याचे सांगितले. शिर्डी येथे नुकतेच संघटनेचे राज्य अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये विविध ठराव पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने मांडण्यात आले. यातील महाराष्ट्र शासनाने व्हॉइस ऑफ मीडियाच्या पाठपुराव्यानंतर घोषित केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी यथाशीघ्र अध्यादेश निर्गमित करावा आणि या महामंडळासाठी वार्षिक २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी , दहा वर्ष पत्रकारीतेत पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधीस्वीकृती देण्यात यावी, दहा वर्ष पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा आणि विनामूल्य उपचार सुविधा द्याव्यात, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी संख्या (कोटा) ठरावावा, प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी, शासनाने पत्रकार संशोधन केंद्राला मान्यता द्यावी, शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे समान धोरण ठरविण्यात यावे, शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबविण्यात येऊन ज्येष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, अशा मागणीची निवेदन महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे व्हॉइस ऑफ मीडिया चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव , देशोन्नतीचे निवासी संपादक राजेश राजोरे , पत्रकार अरुण जैन, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, यांची उपस्थिती होती.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *